Mumbai Metro 3 Aqua Line: आरे ते कफ परेड भुयारी मेट्रोतून सुसाट; तिकीट दर किती, जाणून घ्या सविस्तर

रस्ते मार्गाने आरे ते कफ परेडपर्यंतचं अंतर पार करण्यासाठी २ तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र मेट्रो लाइन ३ मुळे हा प्रवास अवघ्या तासाभरात पार करता येईल.  तिकीट दर किती? 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Metro 3 Aqua Line : मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो-३ म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मार्ग Aqua Line लवकरच पूर्णपणे सुरू होणार आहे. या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड अशा शेवटच्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

37 किलोमीटरची ही मार्गिका मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर एकूण 27 स्टेशन आहेत. ज्यापैकी 26 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत. मेट्रो लाइन 3 मुळे प्रवाशांना सुसाट प्रवास करता येणार आहे. रस्ते मार्गाने आरे ते कफ परेडपर्यंतचं अंतर पार करण्यासाठी २ तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र मेट्रो लाइन ३ मुळे हा प्रवास अवघ्या तासाभरात पार करता येईल. 

तिकीट दर किती? 

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड - 40 रुपये 
आरे JVLR ते कफ परेड - 70 रुपये 
आरे JVLR ते सिद्धिविनायक - 60 रुपये
दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो - 50 रुपये

तिकीट दर जाणून घेण्यासाठी या https://mmrcl.com/en/fare-recharge लिंकवर क्लिक करा

नक्की वाचा - Mumbai Metro 3 :37 KM लांब, 27 स्टेशन, मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत, कधीपासून सुरुवात?

Advertisement

मुंबई मेट्रो-3 चा संपूर्ण रूट आणि थांबे

आरे JVLR
सीप्ज
अंधेरी MIDC
मरोळ नाका
CSMIA टी2
सहारा रोड
CSMIA टी1 
सांताक्रूझ 
वांद्रे कॉलनी 
बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) 
धारावी 
शीतलादेवी मंदिर 
दादर मेट्रो 
सिद्धिविनायक मंदिर 
वरळी 
आचार्य अत्रे चौक 
विज्ञान संग्रहालय 
महालक्ष्मी 
मुंबई सेंट्रल 
ग्रॅँट रोड 
गिरगांव 
कालबादेवी 
सीएसएमटी 
हुतात्मा चौक
चर्चगेट 
विधान भवन 
कफ परेड