Mumbai Metro Line 4A : सप्टेंबरमध्ये चाचणी, डिसेंबरमध्ये शुभारंभ? कसा आहे ठाण्यातील पहिल्या मेट्रोचा मार्ग

Mumbai Thane Metri Route: कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  ठाण्यातील मेट्रोची चाचण सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल असे सांगितले. यामुळे ठाण्यातील पहिली मेट्रो प्रवाशांसाठी कधी सुरू होणार याची उत्सुकता वाढली आहे. मुंबईतील मेट्रो जाळ्याचा विकास केला जात असताना मुंबई आणि ठाणे ही दोन शहरे मेट्रोने जोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यातून मेट्रो मार्ग 4 आणि मेट्रो मार्ग 4 अ या दोन मार्गांची घोषणा करण्यात आली होती. यातील मेट्रो मार्ग 4 हा मुंबईतील वडाळा आणि ठाण्यातील कासारवडवलीला जोडणारा असणार आहे. तर 4अ हा मार्ग कासारवडवली ते गायमुख असा असणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी बोलताना म्हटले होते की, "ठाणे मेट्रोची चाचणी सप्टेंबर महिन्यात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर, डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत."

( नक्की वाचा: कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले! )

Mumbai Metro 4 & 4A Route: कसा आहे मेट्रो 4 आणि '4अ'चा मार्ग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबरपासून ठाण्यातील मेट्रो मार्गावर चाचणीला सुरूवात होईल असे सांगितल्याने असा अंदाज बांधला जात आहे की हा मार्ग प्रवाशांसाठी डिसेंबर महिन्यात सुरू होऊ शकेल. मेट्रो 4 हा मार्ग सुमारे 32.32 किलोमीटर लांबीचा आहे, तर मेट्रो 4अ मार्ग 2.7 किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही मार्गांवर मिळून एकूण 32 स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी, मेट्रो मार्ग 4 वरील ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते मेट्रो मार्ग 4अ मधील गायमुख या दरम्यान चाचणी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. 

Advertisement

संपूर्ण मार्ग कधीपर्यंत सुरू होणार?

मेट्रो 4 प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंतचा हा मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग पूर्ण होईल, तर 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल.

Advertisement

( नक्की वाचा: पुणे मेट्रो स्थानकात तोबा गर्दी, मुंबईतील लोकल स्थानकासारखी धक्काबुक्की )

या दोन्ही प्रकल्पांमध्ये, सध्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन घेतल्या जाणार असून, या चाचण्या पूर्ण झाल्यावर रेल्वे डिझाइन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) कडून मेट्रो गाड्यांची तपासणी केली जाईल. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यावर, या वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

कसा आहे कॅडबरी जंक्शन ते गायमुख अर्थात 4अ मेट्रो मार्ग?

  1. कॅडबरी जंक्शन, 
  2. माजीवाडा, 
  3. कापूरबावडी, 
  4. मानपाडा, 
  5. टिकुजीनीवाडी, 
  6. डोंगरी पाडा, 
  7. विजय गार्डन, 
  8. कासारवडवली, 
  9. गोवनीवाडा,
  10. आणि
  11. गायमुख
Topics mentioned in this article