बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी मुंबईकरांना ‘ऑनलाइन' उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महानगरपालिकेने 50 बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव'सुरू केला आहे. पुरणपोळीची मागणी https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यासाठीची नोंदणी सुरू झाली असून, 28 मार्च 2025 पर्यंत मुंबईकर पुरणपोळीची मागणी नोंदवू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी, 30 मार्च 2025 रोजी पुरणपोळी घरपोच मिळणार आहे. पुरणपोळी महोत्सवअंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
https://shgeshop.com या संकेतस्थळावर आपण मागणी नोंदविल्यानंतर आपल्या नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद होणार आहे. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निवडलेल्या वेळेनुसार पुरणपोळी पोचवली जाणार आहे. महिला सशक्तीकरणसाठी महानगरपालिका सतत महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.
मुंबई महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला बचत गटांनाही त्याचा फायदा झाला आहे.तर मुंबईकरांनाही त्याचा आता लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पुरणपोळी मागवता येणार आहे. त्यातून मुंबईकरांचा पाडवा हा गोड होईल हे मात्र निश्चित. या योजनेला आता प्रतिसाद कसा मिळतो त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.