
दिशा सालियान हिची हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. दिशा सालियान हिचे वडील सतिश सालियान यांनी दिशाची हत्याच झाली असल्याचा आरोप करत मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणाचा फेर तपास केला जावा अशी मागणी ही केली आहे. सालियान यांचे वकील अॅड. निलेश ओझा यांच्या मार्फत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार नाही तर एफआयआर असल्याचा दावा ओझा यांनी केला आहे. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे पिता पुत्राच्या अडचणी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिशा सालियान हिची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा अॅड. निलेश ओझा यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सह आरोपी करण्यात आलं आहे असं ओझा म्हणाले. शिवाय ठाकरे पिता पुत्रासह दिनो मोरया, सुरज पांचोली, त्यांचे बॉडीगार्ड, तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंह, सचिन वाझे आणि रिया चक्रवर्ती हे आरोपी असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या विरोधात तक्रार दिल्याचं ही ते म्हणाले. ही तक्रारच एफआयआर असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.
दिशाचा सालियान हिचा एक मित्र होता. त्याचं नाव स्टिव्ह पिंटो होतं. तिच्या हत्येनंतर त्याने एक ट्विट केलं होतं. त्यात तो म्हणतो 7 जून 2020 ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली. त्यात परमबिर सिंह, सुशांत राजपूत, दिशा सालियन, आदित्य ठाकरे हे होते. शिवाय हत्या कशी झाली याचे संकेत ही त्याने या ट्वीटच्या माध्यमातून दिले आहेत. त्या दिवसापासून तो गायब आहे. त्याची ही चौकशी झाली पाहीजे अशी मागणी ही त्यांनी या ट्वीटचा आधार घेत केली आहे.
या संपुर्ण प्रकरणात ज्या वेळी आदित्य ठाकरे यांचे नाव आले, त्यावेळी परमबिर सिंह यांनी सर्व पुरावे मिटवण्याचं काम केलं. तेच याचे मास्टरमाईंट आहेत, असा आरोप ही वकीलांनी केला आहे. सीसीटीव्ही चेक केले गेले. त्यात कुठलाही नेता नव्हता असंही ते म्हणाले. मात्र काही पुरावे आमच्या हाती ही लागले आहेत. मोबाईल टॉवर नुसार त्यांचे लोकेशन स्पष्ट दिसत आहे असा दावाही ओझा यांनी केला आहे. त्यामुळे परमबिर सिंह हे खोटं बोलत आहेत हे स्पष्ट आहे.
परमबिर सिंह हे कव्हरप साठी मास्टर माईंड होती. आदित्य ठाकरेचं नाव आल्यानंतर सीसीटीव्ही चेक केलं आहे. तिथे कुठेही राजनेता आला नव्हता. मोबाईल टॉवर पासून परमबिर सिंह खोटं बोलत होतं हे स्पष्ट झाले आहे. त्या ही पुढे जावून ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जचा बिझनेस आहे. त्यात त्यांचे नाव आले आहे असा दावा ही त्यांनी केला. त्यावेळी त्यांना अटक होणार होती. पण ती कुणी रोखली. त्यासाठी कितीची डिल झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pune News : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील बरणीत मृत अर्भक? पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ
दिशाची हत्या झाली त्यावेळी आदित्य तिथे होते की नाही हे त्यांनाच सिद्ध करावे लागेल. त्यांनी त्यांचा बचाव करताना जी काही कारणं दिलं आहेत ती सर्व खोटी आहेत असा दावाही ओझा यांनी केला आहे. दरम्यान सतिश सालियान यांनी या प्रकरणाची फेर चौकशी केली जावी अशी मागणी 2023 सालीच केली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ते आताच मागणी का करत आहे हे बोलणं योग्य नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पदाचा गैर वापर केला. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करावं अशी मागणी करण्यात आली आहे. आमची तक्रार खोटी असेल तर आम्हाला फाशी द्या असंही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world