Mumbai News: दहिसर-भाईंदरच्या 'त्या' घटनेची मुंबई महापालिकेने घेतली गंभीर दखल, कामगार सुरक्षेबाबत मोठा निर्णय

दहिसर-भाईंदर जोड मार्ग (DBLR) कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची मुंबई महानगर पालिकेनं तातडीनं दखल घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mira-Bhayandar Link Road Construction

Dahisar Bhayandar Link Road Incident Today : दहिसर-भाईंदर जोड मार्ग (DBLR) कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची मुंबई महानगर पालिकेनं तातडीनं दखल घेतली आहे.या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी तातडीने करण्यात येणार आहे.चौकशीत कामगार सुरक्षिततेत कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल,अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान,कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रमाणित कार्यपद्धती (SOP)निश्चित करण्यात आली आहे. परंतु, याचे पालन करण्यात आले होते का? याची शहानिशाही करण्यात येणार आहे. या घटनेची महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थिती तपासली जाईल. तसच नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: मज्जा, मस्ती अन् रायडिंग! 'त्या' 4 तरुणांनी केला धक्कादायक प्रकार, कल्याणमध्ये होती प्रचंड दहशत

कंत्राटदारांविरुद्ध कठोर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी सुनिश्चित करण्यासाठी ‘व्हीजेआयटी'च्या प्राध्यापकांच्या तज्ज्ञ टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. ही टीम सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ व तथ्याधारित अहवाल सादर करणार आहे. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.कामगार सुरक्षिततेतील कोणत्याही त्रुटींची ओळख पटवून त्या दूर करण्यासाठी ठोस शिफारसी सादर करण्याची विनंती 'व्हीजेआयटी'टीमला करण्यात आली आहे. 

कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा नको

महापालिका कार्यक्षेत्रात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामगार सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत महानगरपालिका प्रशासनाचे शून्य सहिष्णुतेचे (0 Tolerance) धोरण कायम आहे. सर्व उंच आधार संरचना (गॅन्ट्री),क्रेन्स व इतर यंत्रसामग्रीची तृतीय पक्षामार्फत सखोल व पुनः सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच,सुरक्षा लेखापरीक्षण (Safety Audits) नियमित व काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. 

नक्की वाचा >> Sangli News: येरळा नदीत 8 मुलं बुडाली..नदीकाठावर असलेले पालकही पाण्यात उतरले, पण शेवट झाला सर्वात भयंकर

किनारी रस्त्याच्या (वेसावे ते भाईंदर)सर्व पॅकेजमध्ये ‘कार्यस्थळ -आधारित सुरक्षा'ची आदर्श प्रणाली अनिवार्यपणे राबविण्यात येईल.कामगार सुरक्षा पडताळणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल,सर्वंकष व पुनर्तपासणी सुनिश्चित करण्यात येईल.कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.