महागाईत मुंबईकरांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहेत. मुंबईतील प्रवासाचं प्रमुख साधन असलेल्या ऑटो-टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत ऑटो-टॅक्सी भाड्यात 3 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान ऑटोचे किमान भाडे 23 रुपयांवरुन 26 रुपये होणार आहे. तर टॅक्सींसाठी किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये असेल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाचे (MMRTA), अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील या आठवड्यात अंतिम भाडे निश्चित केले जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. ऑटो आणि टॅक्सींसाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती.
परिवहन विभागाने सात ऑटो स्टँड देखील प्रस्तावित केले आहेत. बीकेसी मेट्रो स्टेशन गेट नंबर बी 1 आणि ए 5, वांद्रे कॉलनी विद्यानगरी मेट्रोल स्टेशन ए 1 आणि गेट नंबर ए 2, सांताक्रुज मेट्रो स्टेशन एक्झिट गेट, टी1 विमानतळ एक्झिट गेट, सहार रोड मेट्रो स्टेशन हे स्टँड प्रस्तावित आहेत.