Mumbai News : चौघांचा मृत्यू, कलिंगडाची विक्री घटली; कलिंगडामुळे जीव जाऊ शकतो का? आहारतज्ज्ञांनी केलं अलर्ट

कलिंगडातील कथित विषबाधेमुळे कुटुंबातील चौघांना मृत्यू झाल्यामुळे कलिंगडाच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्रीही निम्म्यावर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबई के पायधोनी इलाके में एक परिवार के चार सदस्यों की मौत फूड पॉइजनिंग के कारण हुई है
  • प्रारंभिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट में मौत की पुष्टि हुई लेकिन जहर के प्रकार का पता चलना बाकी है
  • पुलिस और स्वास्थ्य विभाग परिवार द्वारा खरीदे गए तरबूज के स्रोत और प्रभावित अन्य लोगों की जांच कर रहे हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Mumbai News : मुंबईतील पायधुनी भागातील एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कलिंगडातील कथित विषबाधेमुळे कुटुंबातील चौघांना मृत्यू झाल्यामुळे कलिंगडाच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची विक्रीही निम्म्यावर आली आहे.

चौघांचा मृत्यू फूड पॉइजनिंगमुळेच....

प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, कुटुंबातील चौघांचा मृत्यू फूड पॉइजनिंगमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण आणि विषाचा प्रकार जाणून घेण्यासाठी सर्व नमुने मुंबईतील कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. कलिंगडात नेमकं कोणतं विषारी तत्व होतं आणि मृत्यूचं कारण लॅबचा अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होईल. पोलीस आणि आरोग्य विभागाकडून कुटुंबाने कलिंगड कुठून खरेदी केलं याचा शोध घेत आहेत. त्या भागातील आणखी कुणाला याचा त्रास झाला की नाही याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. कलिंगड शरीराला थंडावा देतं, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन कलिंगड खाल्लं जातं. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Advertisement

कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

२५ एप्रिलची घटना..

१०.३० - कुटुंबाने एकत्र बिर्याणी खाल्ली

१.३० - रात्री उशीरा कुटुंबाने कलिंगड खाल्लं

दुसरा दिवस - २६ एप्रिल

५.३० - पहाटे चौघांची तब्येत बिघडली

१०.१५ - सकाळी लहान मुलगी जैनबचा मृत्यू

१०.३० - रात्री वडील अब्दुल्ला दोकाडियांचा मृत्यू

थोड्या वेळाने पत्नी नसरिन दोकाडिया, मोठी मुलदी आयशा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा उलट्या-जुलाबचा त्रास झाला. यातच चौघांचा मृत्यू झाला)

कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टरांचं काय आहे म्हणणं?

अपोलो रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालधुनीमध्ये कुटुंबासोबत घडलेला प्रकार हा केवळ एक फूड पॉइजनिंग नाही. मूळाच बिर्याणी आणि कलिंगड हे दोन्ही पदार्थ धोकादायक नाहीत. चुकीच्या पद्धतीने साठवणूक करणं, भेसळ, कन्टॅमिनेशन आणि पदार्थ बराच काळासाठी बाहेर ठेवणे. शिजवलेलं अन्न आणि कापलेल्या फळांमध्ये साल्मोनेला आणि इकोला या बॅक्टेरियांची वाढ लवकर होते. 

कोणत्या फळांसोबत काय खायला हवं याकडे लोक दुर्लक्ष करतात. जसं दुधासोबत सायट्रिस फळं खाऊ नयेत. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मोसंबी, संत्र, अननस यासोबत दूध घेऊ नये. यामुळे अपचन, अॅसिडिटी होऊ शकतं. फळांसह पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नये. फळं लवकर पचतात. अशावेळी दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्ले तर बद्धकोष्ठता, गॅसचा त्रास उद्भवतो. त्याशिवाय मासे आणि दूधही एकत्र खाऊ नये यामुळे पचनास अडथळा निर्माण होतो. याशिवाय त्वचा आजाराचा धोका असतो. ज्यांना कफ, सायनसचा त्रास असेल त्यांनीही रात्रीच्या वेळी दही खाणं टाळावं. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळं कापून बाहेर ठेऊ नये. विशेषत: कलिंगड. कारण कलिंगडमध्ये बॅक्टेरियाची जलद गतीने वाढ होते.