White Strip Controversy:मुंबईतील 'या' सोसायटीत थेट पोलीस-CID दाखल! पांढऱ्या रंगाच्या पट्टीवरून नेमकं काय घडलं?

Prasad Vedpathak Video: मुंबईतील कैलास अवेन्यू सोसायटीत जैन धर्मगुरूंसाठी मारलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्टीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे, सविस्तर बातमी वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
Prasad Vedpathak Video: विद्याविहारच्या सोसायटीत पांढऱ्या पट्टीवरून नेमके काय घडलं?
Prasad Vedpathak X And Instagram

Prasad Vedpathak Video: मुंबईतील विद्याविहार येथील एका नामांकित सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. यावर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा वाद वाढल्यानंतर आता घाटकोपर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग (CID) पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विद्याविहारमधील काय आहे संपूर्ण प्रकरण?

विद्याविहार येथील 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये राहणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याच्या दाव्यानुसार, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी (चेअरमन सेक्रेटरी) कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी न घेता मुख्य रस्त्यापासून थेट त्याच्या घरापर्यंत ऑइल पेंटने पांढऱ्या रंगाची पट्टी मारली आहे. ही पट्टी जैन धर्मगुरूंसाठी (साधू-साध्वी) मारण्यात आल्याचे त्याचे म्हणणं आहे. 

Advertisement

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा आक्षेप

प्रसाद वेदपाठकने या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की, "हा व्हिडीओ खास करून मी माझ्या जैन फॉलोअर्स आणि जैन मित्र-मैत्रिणींसाठी करत आहे. आज ही पांढऱ्या रंगाची पट्टी रोडपासून ते माझ्या घरापर्यंत बनवण्यात आली आहे. मी येथे रहिवासी असतानाही मला याबाबत काहीही विचारण्यात आलेले नाही. चेअरमन सेक्रेटरी सरांनी हे सर्व केले आहे. यामागे नेमके काय लॉजिक आहे, हा माझा प्रश्न आहे? हा ऑइल पेंट आहे, जो सहज निघणार नाही."

त्याने पुढे धर्माचा आदर करत सोसायटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढे तो असेही म्हणालाय की,"तुम्ही जर जैनिझम फॉलो करत आहात तर तो खूप चांगला धर्म आहे. पण मला यामागील लॉजिक जाणून घ्यायचे आहे की तुमचे साधू किंवा साध्वी आहेत त्यांनी सांगितलंय का की जर असं काही केलं नाही तर आम्ही तुमच्या घरी येणार नाही? तर तुम्हाला हे चुकीचे वाटत नाहीय? उद्या मी केशरी रंग मारेन, दुसरे कोणी हिरवा रंग मारेल, नंतर कोणी तरी निळा रंग मारेल किंवा मी रेड कार्पेट टाकेन... नाहीतर मी बोलेन की मला तुमच्या घरी यायचं नाही, तर हे योग्य आहे का?"

प्रसाद वेदपाठकचा व्हिडीओ पाहा

A post shared by UIC (@urindianconsumer)

पोलीस आणि सीआयडी सोसायटीमध्ये दाखल

सोसायटीच्या आवारात परवानगीशिवाय सार्वजनिक जागेवर ऑइल पेंट मारल्यामुळे आणि रहिवाशांच्या तीव्र आक्षेपानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. प्रसाद वेदपाठकच्या तक्रारीची दखल घेत घाटकोपर पोलीस आणि सीआयडी (CID) पोलिसांचे पथक 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये दाखल झाले आहेत, पुढील तपास करत आहेत. 

(नक्की वाचा : MSRTC News: एसटीचं उत्पन्न ही वाढणार अन् अवैध प्रवासी वाहतुकीला चाप ही बसणार, महामंडळाचा मास्टर प्लॅन काय?)

Jain Muni साठी सोसायटीत पांढरी पट्टी, इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकने नोंदवला आक्षेप EXCLUSIVE | NDTV
 

Advertisement