मुंबईच्या पार्ले-जी फॅक्टरीची शेवटची आठवण, पर्यावरण विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय, त्या ठिकाणी काय होणार?

विले पार्ले (पूर्व)येथील भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बिस्किट कारखान्याच्या ठिकाणी  विनिर्माण संकुलाचे व्यावसायिक संकुलात पुनर्विकास करण्याची योजना पार्ले प्रोडक्ट्सने आखली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Parle G Factory News
मुंबई:

Mumbai Parle-G Factory News :  विले पार्ले (पूर्व)येथील भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बिस्किट कारखान्याच्या ठिकाणी  विनिर्माण संकुलाचे व्यावसायिक संकुलात पुनर्विकास करण्याची योजना पार्ले प्रोडक्ट्सने आखली आहे.पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) अंतर्गत असलेल्या राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) 7 जानेवारी रोजी या प्रकल्पाला अंशत: मंजुरी दिली. यामुळे ज्यामुळे जागेवरील 21 जीर्ण झालेल्या बांधकामाला पाडण्याची परवानगी मिळाली. 

कंपनीने सर्वप्रथम 2025 च्या मध्यात मुंबई महानगरपालिकेकडे (MCGM) पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला आणि त्यानंतर पर्यावरणीय मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला.विले पार्ले (पूर्व) येथील 5.44 हेक्टर (13.45 एकर) किंवा 54,438.80 चौ. मीटरच्या महत्त्वाच्या भूखंडाचा 1,90,360.52 चौ. मीटर बांधकाम क्षेत्रासह पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे. यात 1,21,698.09 चौ. मीटर एफएसआय क्षेत्र आणि 68,662.43 चौ. मीटर गैर-एफएसआय बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹3,961.39 कोटी आहे.

पुनर्विकासासाठी सादर केलेल्या योजनांमध्ये चार इमारतींसोबतच तीन आणि सहा मजली अशा दोन स्वतंत्र पार्किंग टॉवरांच्या प्रस्तावाचा समावेश आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये,भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने (AAI) विमानतळाची जवळीक आणि एअर फनेल झोनमध्ये प्रकल्पाचे स्थान लक्षात घेऊन,एका इमारतीसाठी 30.40 मीटर आणि दुसऱ्यासाठी 28.81 मीटर उंची मर्यादेसह अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) जारी केले. 

नक्की वाचा >> Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर चिकटवल्या जाहिराती, शिवप्रेमींमध्ये संताप

पहिल्या तीन इमारतींच्या ‘ए विंग'मध्ये सहा मजले

मात्र,पर्यावरण मंजुरी कागदपत्रांनुसार कंपनीने एका इमारतीसाठी 30.70 मीटर उंचीची मागणी केली आहे,जी निर्धारित मर्यादेपेक्षा 0.30 मीटर जास्त आहे.प्रस्तावित चारही इमारतींना दोन बेसमेंट असतील.पहिल्या तीन इमारतींच्या ‘ए विंग'मध्ये सहा मजले प्रस्तावित आहेत.बिल्डिंग क्रमांक 1 च्या ‘बी विंग'चा काही भाग व्यावसायिक वापरासाठी राखण्यात आला आहे. पहिला,सातवा आणि आठवा मजला दुकाने व कार्यालयांसाठी असतील. तर दुसऱ्या ते सहाव्या मजल्यांपर्यंतचे मजले पार्किंगसाठी नियोजित आहेत.

Advertisement

या व्यावसायिक संकुलात रिटेल दुकाने,रेस्टॉरंट्स आणि फूड कोर्ट समाविष्ट असण्याची अपेक्षा आहे.SEIAA च्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, या परिसरात सध्या 508 झाडे आहेत.यापैकी 311 झाड्याचं संवर्धन केलं जाईल. 129 झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे आणि 68 झाडे दुसरीकडे स्थलांतरित केली जातील.कंपनीने मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव दिला असून या अंतर्गत 1,203 नव्या झाडांची लागवड केली जाईल. बांधकाम पूर्ण झाल्यावर या ठिकाणी झाडांची एकूण संख्या 2,230 वर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

नक्की वाचा >> Pune News: हापूस आंब्याच्या पेटीचा दर फुटला, किंमत ऐकून थंडीतही फुटेल घाम

2016 च्या मध्यात बिस्किट उत्पादन कायमस्वरूपी बंद

विले पार्लेतील या कारखान्यात 87 वर्षे उत्पादन सुरू झाल्यानंतर 2016 च्या मध्यात बिस्किट उत्पादन कायमस्वरूपी बंद झाले. तरीही कंपनीचे कर्मचारी या परिसरात कार्यरत राहिले. चौहान कुटुंबाने स्थापन केलेल्या या कंपनीचा 1929 मध्ये उभारलेला हा कारखाना विले पार्लेच्या नावावरून ठेवलेल्या पार्ले-जी बिस्किटाशी जोडलेला होता. “जी”चा अर्थ ग्लूकोज असा आहे. कारखाना बंद करण्याच्या वेळी कंपनीने उत्पादनातील घट हे परिचालन बंद करण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले होते.

Advertisement