Pune Shocking News : पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीदरम्यान सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि शहरात बॅनरबाजी केली. पुणे महापालिकेच्या बोर्डावरही अनेक नेत्यांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं. परंतु,विमान नगरमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण महापालिकेच्या बोर्डावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवरच जाहीराती चिकटवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसीच्या बोर्डावर एक कर्मशियल जाहीरात बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याचं समोर आलंय.या बोर्डावर आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला होता. परंतु, महाराजांच्या फोटोवर अन्य जाहीरात लावल्याने शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा >> GK News : कसं करायचं वंदे भारत ट्रेनचं तिकीट बुकिंग? IRCTC मध्ये किती तिकीट बुक करू शकता? अनेकांना माहितच नाही
पतीत पावन संघटनेनं महापालिकेकडे केली लेखी तक्रार
Pune: Illegal Advertisement Defacing Shivaji Maharaj's Image Sparks Outrage in Pune; Case Registered https://t.co/AiycSJHCnw
— Punekar News (@punekarnews) January 24, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रत्येक नागरिकामध्ये आदराची भावना आहे. अशातच पतीत पावन संघटनेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणाऱ्या कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. जे कोणी या प्रकाराला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> गावात वृक्षारोपण करणाऱ्या महिला सरपंचाची ओढणी खेचली..शिविगाळ करून मारहाण केली, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
या जाहीरातीचा व्हिडीओ आणि जाहिरात क्रमांकाची माहितीही पालिकेला देण्यात आली आहे.नगर रोड प्रादेशिक विभागाचे उपायुक्त संजय पोल यांनी म्हटलंय की, "महापुरुषांच्या बोर्डवर अशाप्रकारच्या जाहीराती लावल्या असतील, तर अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांना नोटिस पाठवून दंड ठोठावण्यात येईल".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world