मुंबई- पुणे-एक्सप्रेस हायवे दीड तासासाठी बंद राहाणार, 'हा' आहे पर्यायी मार्ग

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दिड तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी हा मेगाब्लॉक असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दिड तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी हा मेगाब्लॉक असेल.  सकाळी साडे दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे दिड तासांसाठी हा मेगाब्लॉक असेल. या कालावधीत वाहतूक पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार आहे. अशा वेळी प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 18 आणि 19 मे ला मुंबई पुणे महामार्गावरील पुणे वाहिनीच्या एका भागावर गॅन्ट्रीची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. शिवाय त्याच्या दुरुस्तीचे काम असणार आहे. या काळात सर्व वाहनधारकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 18 मे सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुणे जलवाहिनीवरील वाहतूक या कालावधीत पूर्णपणे बंद राहील. द्रुतगती मार्गावरील वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून शेडोंग आणि खोपोलीमार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुण्याला जाण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचा - पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 19 मे ला ही सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  यावेळी कुसगाव पाटकर स्थानकातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कडे वाहने देहू रोडमार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील याचीही सर्वांना नोंद घेण्यास सांगितली आहे. वाहनधारकांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीत मदतीसाठी वाहनधारक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कंट्रोल रूमशी 9822498224 किंवा महामार्ग पोलिस विभागाशी 9833498334 या क्रमांकावर अधिक माहिती मिळवू शकता. 

Advertisement