जाहिरात
Story ProgressBack

पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

प्रचार जरी थंडावणार असला तरी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांनंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 लोकसभेच्या जागांवर 20 मे ला मतदार होणार आहे.

Read Time: 3 mins
पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं
मुंबई:

लोकसभेच्या पाचव्या टप्प्प्यातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. मात्र प्रचार जरी थंडावणार असला तरी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांनंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 लोकसभेच्या जागांवर 20 मे ला मतदार होणार आहे. या मतदार संघातला प्रचार आज (शनिवार ) थंडावणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुठे प्रचार थंडावणार? 

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातला 13 लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघात सह ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदार संघांचाही समावेश आहे. शिवाय नाशिक दिंडोरी आणि धुळे या मतदार संघातही मतदान होणार आहे. इथला प्रचारही आज संध्याकाळी थांबेल. त्यानंतर घरोघरी प्रचारावर उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा भर असेल. 

हेही वाचा - उद्धव ठाकरे म्हणतात, "नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत"

ठाकरेंच्या सभांचा धडाका 

उद्धव ठाकरे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत.  मुंबईत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांसाठी सभा घेणार आहेत. तर राज ठाकरेही इशान्य मुंबईत प्रचारासाठी जाणार आहेत. या शिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्याही प्रचार सभा होणार आहेत. 

हेही वाचा - 'इतकं मतपरिवर्तन झालेला पक्ष देशात कोणताही नाही', शिवाजी पार्कमधील सभेत मोदींचा हल्लाबोल

मुंबई ठाण्यावर असेल लक्ष

पाचव्या टप्प्यात मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान होईल. या मतदार संघात उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहे. सहा पैकी चार लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. तर काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. तर भाजप मुंबईच्या तीन आणि शिंदे गट तीन जागा लढत आहेत. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल किर्तीकर, संजय दिना पाटील यांचे भवितव्य ठरणार आहे. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव, रविंद्र वायकर आणि राहुल शेवाळे मैदानात आहेत. तर भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उज्ज्वल निकम हे मैदानाता आहेत. 

हेही वाचा - महाराष्ट्राला नरेंद्र मोदींकडून 7 अपेक्षा, राज ठाकरेंनी त्यांच्यासमोरच बोलून दाखवल्या

कल्याण ठाण्यात मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 

मुंबई प्रमाणे ठाणे जिल्ह्यातही मतदान होणार आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. कल्याण लोकसभेत मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे स्वत: निवडणूक रिंगणात आहेत. तर ठाण्यातून नरेश म्हस्के हे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे सहकारी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यादोघांनाही निवडून आणण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे. शिवाय भिवंडी आणि पालघरच्या जागा निवडून आणण्यासाठी भाजपला मदत करावी लागणार आहे. 
 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाजप कोट्यातील एका जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा? विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली
पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं
Will Varsha Gaikwad of Congress win or Ujjwal Nikam of BJP will win North Mumbai Lok Sabha constituency
Next Article
उत्तर मध्य मुंबईत तगडी लढत, गायकवाड की निकम? कौल कुणाला?
;