Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !

यंदाच्या पावसाळ्या दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

24 जून पासून 28 जून 2025 पर्यंत असे सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीदरम्यान 19 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ  भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा  26 जून 2025 रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?

वरीलनुसार यंदाच्या पावसाळ्या दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल खालीलप्रमाणेः- 

जून 2025
१. मंगळवार, दि. २४.०६.२०२५        सकाळी – ११.१५ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
२. बुधवार, दि. २५.०६.२०२५          दुपारी – १२.०५ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.७१
३. गुरुवार, दि. २६.०६.२०२५          दुपारी – १२.५५ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.७५
४. शुक्रवार, दि. २७.०६.२०२५         दुपारी – ०१.४० वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३ 
५. शनिवार, दि. २८.०६.२०२५         दुपारी – ०२.२६ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४ 

Advertisement

जुलै 2025
१. गुरुवार, दि. २४.०७.२०२५         सकाळी – ११.५७ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. २५.०७.२०२५         दुपारी – १२.४० वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
३. शनिवार, दि. २६.०७.२०२५         दुपारी – ०१.२० वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.६७
४. रविवार, दि. २७.०७.२०२५         दुपारी – ०१.५६ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.६०

Advertisement

ऑगस्ट 2025
१. रविवार, दि. १०.०८.२०२५             दुपारी – १२.४७ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
२. सोमवार, दि. ११.०८.२०२५           दुपारी – ०१.१९ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
३. मंगळवार, दि. १२.०८.२०२५         दुपारी – ०१.५२ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
४. शनिवार, दि. २३.०८.२०२५         दुपारी – १२.१६ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५४
५. रविवार, दि. २४.०८.२०२५         दुपारी – १२.४८ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३

सप्टेंबर 2025
१. सोमवार, दि. ०८.०९.२०२५           दुपारी – १२.१० वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. मंगळवार, दि. ०९.०९.२०२५         दुपारी – १२.४१ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.६३
३. बुधवार, दि. १०.०९.२०२५              मध्यरात्री – ०१.१५ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
४. बुधवार, दि. १०.०९.२०२५              दुपारी – १३.१५ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
५. गुरुवार, दि. ११.०९.२०२५               मध्यरात्री – ०१.५८ वा.        लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९