जाहिरात

Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?

वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य असलेल्या अमोल लांडगे यांना आपण कोणावर टीका करतोय, आणि काय टीका करतोय याचे भानही राहीले नव्हते.

Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?
सोलापूर:

राजकारणात सध्या टीका करताना भाषा घसरल्याचे वारंवार दिसून आले आहे. विरोधकांवर टीका करताना मर्यादा पाळल्या पाहीजे असं बोललं जातं. राजकारणी ही त्याला सहमती दर्शवतात. पण प्रत्यक्षात त्यांना जे करायचे आहे तेच ते करतात. त्यातूनच टोकाची टीक केली जाते. टीक करत असताना आपण कुणावर ती करत आहोत याचेही भान काही जणांना राहात नाही. असाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. इथं खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी खालच्या शब्दात टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार आहेत. त्यांना इथं वंचित बहुजन आधाडीचा मोठा विरोध आहे. त्यातूनच त्यांच्यावर टीका ही केली जाते. पण यावेळी त्यांच्यावर केलेली टीका ही अतिशय खालच्या पातळीवरची आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे यांनी ही टीका केली आहे. खासदार प्रणिती शिंदे या सेक्युलर म्हणून मत मागायला आल्यानंतर त्यांना चपलेने मारा आणि पळवून लावा असं वादग्रस्त वक्तव्य लांडगे यांनी केले आहे. 

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य असलेल्या अमोल लांडगे यांना आपण कोणावर टीका करतोय, आणि काय टीका करतोय याचे भानही राहीले नव्हते. वंचित बहुजन आघाडीच्या सोलापुरात मोर्चा निघाला होता. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडीला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपची बी टीम म्हणून संबोधले होते. मात्र खासदार प्रणिती शिंदे तुम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणा सोबत युती केली ते सांगा? असा प्रश्नही यावेळी लांडगे यांनी केला.  

ट्रेंडिंग बातमी - Voter ID Card: घर बसल्या बनवू शकता ऑनलाइन नवीन मतदान ओळखपत्र, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

यावेळी ते म्हणाले आम्ही छातीठोकपणे सांगतो, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी बाजार समितीत भाजपसोबत युती केली. मी प्रणिती शिंदे यांचे नाव घेतल्यावर आमच्या महिला भगिनी चप्पल काढायला लागल्या आहेत. मात्र तुम्ही आता चप्पल काढू नका. ज्यावेळी खासदार प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून तुमच्याकडे मत मागायला येतील त्यावेळी त्यांना जाब विचारा, की आंबेडकर साहेबांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. त्यामुळे मत मागायला आल्या की तोंडं फिरवा, त्यांना चप्पल मारा आणि त्यांना तसेच पुढे पळवा असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या यावक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com