Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता (Mumbai University Senate Election) होणारी निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक रविवारी (22 सप्टेंबर) होणारहोती. विद्यापीठानं शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करत सिनेटची निवडणूक स्थगित केली होती. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठानं काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शनिवारी (21 सप्टेंबर) रोजी तातडीनं सुनावणी घेत हायकोर्टानं हे आदेश दिले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणामध्ये होणार सामना?
सिनेट निवडणुकीत ठाकरे यांची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( Yuva Sena vs ABVP) असा सामना होणार आहे महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नव्हते. तर छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांनीही उमेदवार उभे केले होते. शिंदे यांच्या शिवसेनेकडून सिनेट निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते. सलग दुसऱ्यांदा सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली होती. तसंच मनसे नेते अमित ठाकरे यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. रते रहो, यह डर अच्छा है, लेकीन हम अपने लोकतंत्र के लिए लडेंगे और जितेंग अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. तर, प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशी थेट टिका अमित ठाकरे यांनी केली होती.
( नक्की वाचा : रविंद्र चव्हाणांना वाढदिवशीच कुणी डिवचलं? डोंबिवलीत लागलेल्या बॅनरमुळे खळबळ )
युवा सेनेचा नाही तर पदवीधरांचा विजय
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय हा युवा सेनेचा नाही तर पदवीधरांचा विजय असल्याची भावना या संघटनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत, असंही त्यांनी जाहीर केलं.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक युवा सेना उमेदवार
प्रदीप सावंत
मिलिंद साटम
परम यादव
अल्पेश भोईर
किसन सावंत
स्नेहा गवळी
शीतल शेठ
मयूर पांचाळ
धनराज कोहचडे
शशिकांत झोरे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमेदवार
हर्षद भिडे
प्रतीक नाईक
रोहन ठाकरे
प्रेषित जयवंत
जयेश शेखावत
राजेंद्र सायगावकर
निशा सावरा
राकेश भुजबळ
अजिंक्य जाधव
रेणुका ठाकूर