Mumbai Water Metro : स्वस्त दरात मुंबईत 'वॉटर मेट्रो'चा पर्याय, 29 टर्मिनल उभारणार, 10 मार्गांची निवड

मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत चालला आहे. आगामी काळात त्यावर उपाय योजना म्हणून वॉटर मेट्रोचा पर्याय दिला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत चालला आहे. आगामी काळात त्यावर उपाय योजना म्हणून वॉटर मेट्रोचा पर्याय दिला जाणार आहे. दरम्यान वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईत वाहतूक कोंडीला पर्याय वॉटर मेट्रो सुरू होईल अशी नागरिकांना आशा आहे. 

मुंबई वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणीचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला देण्यात आलं होतं. त्यांच्या अहवालाचं सादरीकरण 16 जून रोजी मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासमोर सादर करण्यात आलं होतं. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागातील पाणीपुरवठा 11 तास बंद !

वॉटर मेट्रो सुरू झाली तर मुंबईच्या लोकल आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि हजारो प्रवाशांना वॉटर मेट्रोमधून जलद आणि आरामात प्रवास करता येईल.या प्रकल्पासाठी, केएमआरएल म्हणजेच कोची मेट्रो रेल लिमिटेडकडून तांत्रिक सहाय्य घेण्यात आलं आहे. सध्या कोचीमध्ये सुरू असलेली वॉटर मेट्रो सेवा ही देशातील पहिली वॉटर मेट्रो आहे. ती 2023 मध्ये सुरू झाली. तेथे ही सेवा यशस्वी राहिली आणि कोच्ची परियोजनाच्या यशामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मुंबईतही जल वाहतूक वाढविण्यासाठी ही योजना तयार केली आहे. 


वॉटर मेट्रोची खास वैशिष्ट्यं...

  1. तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात 
  2. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत आणि नवी मुंबईतील दक्षिण मुंबईत येण्यासाठी चांगला पर्याय
  3. एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार
  4. दहा मार्गांची निवड
  5. प्रकल्पासाठी अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित
  6. वॉटर मेट्रोमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार
  7. डिसेंबर 2026 पासून मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होण्याची शक्यता
  8. सद्यस्थितीत नरीमन पॉइंट ते वांद्रे आणि वांद्रे ते वर्सोवापर्यंत दोन महत्त्वपूर्ण मार्ग प्रस्तावित
  9. मेट्रोमध्ये एसी, वायफाय, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित दरवाजे 
  10. मुंबई वॉटर मेट्रोसाठी इलेक्ट्रिक बोट्स, एसी टर्मिनल, क्यूआर कोड तिकीट बुकिंग आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून सेवा उपलब्ध होतील..
  11. कोचीप्रमाणे येथेही कॉमन कार्ड सिस्टिम लागू केले जातील