Mumbai Lakes : मुंबईकरांसाठी Good News, एकाच दिवसात 12 टक्के पाणीसाठा वाढला

Mumbai Water Supply dams : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात एकाच दिवसात 12 टक्के वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Water Supply dams : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
मुंबई:

Mumbai Water Supply dams : यंदा राज्यात पावसाला दरवर्षीपेक्षा लवकर सुरुवात झाली. अनेक भागात मे महिन्यामध्येच पावसानं दमदार हजेरी लावली. विशेषत: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसानं चांगली सुरुवात केली होती. पण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात मात्र फारसा पाऊस झाला नव्हता. धरणसाठ्यांच्या पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात एकाच दिवसात 12 टक्के वाढ झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबईला तानसा, मोडक सागर, विहार, तुलसीस अप्पर वैतारणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात धरणामधून पाणीपुरवठा होतो. या धरणातील सरासरी पाणीसाठा चार दिवसांपूर्वी आठ टक्के शिल्लक होता. तो आता 25 टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी या पाणीसाठ्यात 12 टक्के वाढ झाली आहे. 

मुंबईतील सर्व धरणांमध्ये गुरुवारी 1 लाख 90 हजार 771 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. तो शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 3 लाख 64 हजार 233 दशलक्ष लिटर इतका वाढला आहे. मुंबईतील सर्व तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यास 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवू शकतात. मागील वर्षी हाच पाणीसाठा 5.32 टक्के तर 2023 साली 7.72 टक्के इतका उपलब्ध होता. 

Advertisement

( नक्की वाचा : Satara News : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश )

नाशिक, ठाणे, शहापूर, पालघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. विशेष म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

Topics mentioned in this article