Mumbai Rain: मुंबईतून पाऊस गायब! नागरिकांचं टेन्शन वाढलं; पुन्हा कधी बरसणार? हवामान विभागाने दिली माहिती

Mumbai Rain Update: मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर बुधवारी आणि गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 26 आणि 27 जून रोजी पावसाचा जोर आणखी ओसरणार असून मान्सून काही काळ कमकुवत राहील.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rain Update: मंगळवारी रात्रभर मुंबईला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवार आणि गुरुवारी चांगलाच ब्रेक घेतला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे हा पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी, बुधवार आणि गुरुवार मुंबईकरांसाठी कोरडे गेले असले, ही स्थिती फार काळ राहणार नाही. येत्या 1 ते 5 जुलैदरम्यान मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर प्रचंड वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुढील 2 दिवस पावसाचा जोर कमी होणार

'वेगरिज ऑफ वेदर'चे प्रमुख राजेश कपाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 जून रोजी मुंबईतील पावसाच्या प्रमाणात मोठी घट होणार आहे. सध्या मुंबईत सरासरी 200 ते 300  मिमी असणारा पाऊस पुढील दोन दिवसांत प्रतिदिन 40 मिमीपर्यंत खाली येईल.

या काळात मान्सूनचा प्रवाह कमकुवत राहणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान मुंबईत विशेष असा काही पाऊस पडणार नाही. यामुळे मुंबईसाठी सध्या कोणताही अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, रविवारी म्हणजेच 28 जूनपासून पावसाच्या हलक्या सरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: भांडुप जंक्शनवर बाईक चालकांना का वाटतेय भीती? जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास)

1 जुलैपासून दमदार पावसाची शक्यता

हवामान बदलाच्या नवीन अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून मान्सूनचा प्रवाह अधिक सक्रिय होणार असून पश्चिम किनारपट्टीवरील हालचाली पुन्हा वेग घेतील. 1 जुलैपासून परिस्थितीमध्ये पूर्णपणे बदल होऊन पावसाचा जोर वाढेल.

1 ते 5 जुलैचा हवामान अंदाज

मुंबई आणि परिसरात या 5 दिवसांत 350 ते 450 मिमी पावसाची शक्यता आहे. मान्सून अत्यंत सक्रिय राहणार असल्याने दररोज सरासरी 100 मिमी पाऊस पडू शकतो. विशेषतः 4 आणि 5 जुलै रोजी पावसाचा जोर सर्वाधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Passport Fee Hike: सर्वसामान्यांना फटका! 1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महागणार; सुधारित दर जाहीर)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाना ओढ दिल्याने मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

  • वैतरणा - 0 टक्के
  • मोडकसागर - 20.46 टक्के
  • तानसा - 1.85 टक्के
  • मध्य वैतरणा - 10.98 टक्के
  • भातसा - 7.1 टक्के
  • विहार 45.13 टक्के 
  • तुळशी तलाव - 22.2 टक्के
     
Topics mentioned in this article