Nagpur News : नागपुरात उड्डाणपूल थेट घरात घुसला; वाचा काय आहे का कधीही न झालेला प्रकार....

Nagpur News : नागपूरमध्ये 998 कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचा एक भाग एका घराच्या बाल्कनीजवळून जात असल्याचं उघड झालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur News : नागपुरातील या धक्कादायक प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. (फोटो - @MumbaiCommunit2)
नागपूर:

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 90 अंशाचा उड्डाणपूल काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. या पुलाच्या बांधकामावरुन शहर नियोजनाची चांगलीच चर्चा आणि टीका झाली होती. पण, या घटनेनंतर अद्याप  यंत्रणेला जाग आल्याचं दिसत नाही. कारण, नागपूरमध्ये यापुढील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. 

काय आहे प्रकरण?

नागपूरमध्ये 998 कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचा एक भाग एका घराच्या बाल्कनीजवळून जात असल्याचं उघड झालंय. या प्रकाराची  सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नागपुरातील अशोक चौकातील या पुलामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, या उड्डाणपुलाला नेटिझन्सनी 'फ्लाईओव्हर-टच हाऊस' असं नाव दिलं आहे.

हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उड्डाणपुलाचा एक भाग थेट घरात घुसत असल्याचं दिसत आहे. यामुळे सुरक्षा, डिझाइनमधील त्रुटी आणि खासगी मालमत्तेकडे केलेला दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमल चौक, रेशीमबाग चौक आणि दिघोरी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल तयार केला जात आहे. पण सध्या हा प्रकल्प चुकीच्या नियोजनाचे उत्तम उदाहरण बनला आहे.

( नक्की वाचा : MHADA News : सर्वात मोठी पुनर्विकास योजना; गोरेगावच्या रहिवाशांना ‘जॅकपॉट' लागला; 1600 चौरस फूट घर मिळणार )
 

स्थानिक मीडियानुसार, हे घर पत्रे कुटुंबाचे आहे. त्यांच्या घराची बाल्कनी उड्डाणपुलाच्या बाहेरील कडेला जोडलेली दिसत आहे.  नागपूर महानगरपालिकेने (NMC) महिन्यांपूर्वी या कुटुंबाला नोटीस पाठवली होती. पण त्यानंतर कोणतीही पुढील कारवाई करण्यात आलेली नाही.

Advertisement

घर मालकांनी काय सांगितलं?

याबाबतच्या वेगवेगळ्या वृत्तानुसार, हे घर प्रवीण पत्रे यांचे आहे. प्रवीण सांगतात, 'आमचे घर 150 वर्षांहून अधिक जुने आहे आणि 2000 मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात आली. या बांधकामाबद्दल आम्हाला कोणतीही हरकत नाही. उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाने आम्हाला माहिती दिली होती. तेव्हाही आमची काही हरकत नव्हती आणि आताही नाही.' प्रवीण यांच्या मुलीने सांगितले की, जेव्हा उड्डाणपूल पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, तेव्हा घरात आवाज कमी करण्यासाठी ते योग्य उपाय करतील.

NHAI चे स्पष्टीकरण

या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. NHAI ने X वर पोस्ट करत सांगितले, 'सोशल मीडियावर इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यावर आम्ही स्पष्टीकरण देत आहोत की, बांधकामादरम्यान NHAI ने हे अतिक्रमण असल्याचे ओळखले होते. ते हटवण्यासाठी आम्ही नागपूर महानगरपालिकेला विनंती केली होती.'

Advertisement

एनएचएआयने पुढे म्हटले की, 'एनएमसीनेही याची पडताळणी केली होती. संबंधित घराचे बांधकाम कोणत्याही मंजूर बांधकाम योजनेशिवाय करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रोटरी बीमच्या शेवटच्या काठापासून घराच्या संरचनेच्या काठापर्यंत 1.5 मीटरचे अंतर आहे. तरीही, घरमालकाने त्यांच्या प्लॉटच्या हद्दीबाहेर बाल्कनी वाढवली आहे. लवकरच हा भाग पाडण्यात येईल.'
 

Topics mentioned in this article