व्हिआयपींच्या गर्दीत चहावाला, शपथविधीला खास निमंत्रण, काय आहे नागपूर कनेक्शन?

गोपाळ बानवकुळे हा देवेंद्र फडणवीसांचा जबरा फॅन आहे. त्याचं नागपुरच्या रामनगर परिसरात चहाचं दुकान आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

महायुती सरकारचा 5  डिसेंबरला शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी देशभरातले VVIP ना निमंत्रित करण्यात आले आहे. या VVIP च्या गर्दीत असा एक पाहुणा आहे ज्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. हा खास पाहुणा नागपूरचा असून तो एक चहावाला आहे. त्याचं नाव गोपाळ बावनकुळे असून तो देवेंद्र फडणवीसांचा जबरा फॅन आहे. त्यामुळे फडणवीसांच्या कार्यालयातून शपथविधीला हजर राहण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे तो 5 डिसेंबरला मुंबईत शपथविधीसाठी हजर राहणार आहे. त्या दिवशी त्याने आपल्या चहाच्या दुकानात खास ऑफरचीही घोषणा केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गोपाळ बानवकुळे हा देवेंद्र फडणवीसांचा जबरा फॅन आहे. त्याचं नागपुरच्या  रामनगर परिसरात चहाचं दुकान आहे. त्याच्या या टी स्टॉलवर अन्य कोणाचाही फोटो न लावता फक्त देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावला आहे. आपण देवेंद्र फडणवीसांचे मोठे चाहते आहोत असं तो सांगतो. शिवाय फडणवीस आपल्या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी आले होते अशी आठवणही तो सांगतो. तेव्हा पासून फडणवीसांनी आपल्याला कधी ही विसरले नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही काम घेवून गेल्यावर ते नेहमी करतात. शिवाय ते आपण फोनवर केलेल्या मेसेजलाही उत्तर देतात असं गोपाळ यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल

महायुतीचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून फोन आला होता. शपथविधीसाठी तुमचं नाव आहे. आवश्यक असलेली कागदपत्र ही मागवण्यात आली असं बावनकुळे यांनी सांगितलं. मी देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार असल्याचं ते म्हणाले. फडणवीसांना आपण चहा पिण्यासाठी दुकानावर बोलवलं आहे. तेही मुख्यमंत्री झाल्यावर या असं सांगितलं होतं. आत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर चहा घेण्यासाठी गाडीवर नक्कीच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महिला वाहतूक पोलिसांची तत्परता, गर्भवती महिलेची रस्त्याच्याकडेलाच केली प्रसूती

दरम्यान शपथविधीला मुंबईला जाणार आहे. त्यावेळी आपलं चहाचं दुकान सुरूच ठेवणार आहे. त्या दिवशी दुकानावर पत्नी असेल. ज्या वेळी फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील त्यावेळी दुकानावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत चहा देणार असल्याची घोषणा ही बावनकुळे यांनी केली आहे. फडणवीसांच्या प्रेमापोटी आपण हे करत असल्याचे ते म्हणाले. आपल्या नागपूरची व्यक्ती मुख्यमंत्री होते ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही ते म्हणाले. फडणवीसांनी आपल्याला मदत केली होती असंही गोपाळ यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. 

Advertisement