सूरज कसबे
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामध्ये अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाकड नाका येथे हिंजवडी वाहतूक विभागात त्या कामावर होत्या. त्यावेळी एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने त्या महिलेला मदतीचा हात दिला. वेळेत डॉक्टर आणि रुग्णवाहिका पोहोचणार नाही हे त्यांना लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला धिर देत रस्त्या शेजारीच तिची प्रसूती केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख हा पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेत कामाला आहेत. रविवारीही त्या सेवेत होते. वाकड नाक्यावर त्यांची ड्युटी होती. संध्याकाळची वेळ होती. राजश्री वाघमारे या गर्भवती महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या निलम आणि रेश्मा यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने त्या गर्भवती महिलेच्या दिशेन धाव घेतली. रुग्णवाहीका आणि डॉक्टरांना बोलावण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
पण त्यांना यायला वेळ लागणार होता. अशी वेळी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला. पण त्यांनी अधिक वेळ न दवडता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेडमध्ये राजश्री यांनी नेले. त्यांना तिथे या दोघींनीही धिर दिला. डॉक्टर अजूनही आले नव्हते. त्या वेळी अखेर राजश्री यांनी एका गोंडल मुलाला रत्यावरच जन्म दिला. त्यावेळी बाळाची आणि त्याच्या आईची काळजी सेवेवर असलेल्या नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंना नेमकं हवंय तरी काय? जवळच्या नेत्याने बोलता बोलता सांगून टाकलं
बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच तिथे डॉक्टर आले. त्यांनी बाळ आणि राजश्री यांची तपासणी केली. त्यानंतर पुढील उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळे खाकीमधील माणुसकीला पाझर फुटला. त्या दोघींच्या मदतीमुळेच राजश्री यांची प्रसुती होवू शकली. शिवाय त्यांना त्यावेळेत धिरही मिळाला.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? अंजली दमानिया यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण
त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना गौरविले आहे. पोलिस दलामध्ये या दोघींच्या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. शिवाय त्यांच्या पाठिवर शब्बासकीची थापही पडलेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world