Nashik TCS Case: टीसीएस प्रकरणात पॉलिटिकल कनेक्शन उघड; महाराष्ट्र हादरवणाऱ्या प्रकरणाला नवे वळण!

Nashik TCS Case, Nida Khan: नाशिक हादरवणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम (MIM) पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar: नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गेल्या काही दिवसांपासून कुठे होती, या गूढ प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या खुलाशानंतर नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवत त्यांना तपासासाठी नोटीस बजावली आहे.

तपासात काय आले समोर?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गुन्ह्यानंतर निदा खान फरार झाली होती. पोलीस तिचा शोध घेत असतानाच ती छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळाली. सखोल तपासाअंती असे समोर आले की, नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला होता. एका गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत करणे आणि आश्रय देणे यावरून आता मतीन पटेल अडचणीत आले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)

राजकीय वर्तुळात खळबळ

लोकप्रतिनिधीनेच गुन्ह्यातील आरोपीला अशा प्रकारे मदत केल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस आता मतीन पटेल यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा-  Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?)

मास्टरमाईंड कोण? - शिरसाट

"निदा खान ही केवळ एक मोहरा असून या प्रकरणाचा खरा 'मास्टरमाइंड' कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी मंत्री संजय संजय शिरसाट यांनी केली आहे. या प्रकरणात एमआयएमच्या नेत्यांची आणि नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी आधीच शिरसाट यांनी केली होती. तसेच खात्रीलायक सांगतो यामध्ये MIM चा हात आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं होतं.