नाशिकमधील ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोड्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या चोरीच्या घटनेत ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास 5 कोटी रुपयांचं सोनं लंपास केले आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या आपल्या सोन्याची भरपाई मिळणार की नाही या चिंतेत ग्राहक होते. मात्र ग्राहकांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही, असं स्पष्टीकरण ICICI बँकेने दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ICICI HFC ने पत्रक जारी करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "चोरीचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ICICI HFC पोलीस तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची खात्री आम्ही देतो, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
( नक्की वाचा : नाशिकच्या ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर PPE किट घालून दरोडा, 5 कोटींचे दागिने लंपास )
222 लॉकर्स फोडले
नाशिकच्या ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकून चोरट्यांनी 222 खातदारांचे लॉकर्स फोडले होते. चोरांनी या लॉकर्समधून तब्बल 5 कोटी रुपयांचे दागिने पळवले होते. या घटनेनंतर चिंतीत असलेल्या ग्राहकांना ICICI होम फायनान्सच्या निवेदनानंतर दिलासा मिळाला आहे.
(नक्की वाचा - टेंडर घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, मंत्र्याच्या PA च्या मदतनीसाच्या घरातून तब्बल 25 कोटींची कॅश जप्त)
PPE किट घालून चोरी
नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकात ICICI होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय आहे. अत्यंत गजबलेला आणि वर्दळीचा असा हा परिसर आहे. मात्र तरीही चोरट्यांनी याठिकाणी दरोडा कसा टाकला? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. ओळख पटू नये म्हणून चोर पीपीई किट घालून कार्यालयात घुसले होते. चोरीच्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.