TCS Nashik Case: 'टीसीएस'मधील पासवर्ड देखील घाणेरडे! आणखी एका पीडितेने नोंदवला खळबळजनक जबाब

TCS Nashik Case: नाशिक येथील टीसीएस (TCS) बीपीओ युनिटमधील छळाचे प्रकरण अधिकच गंभीर झाले असून, पीडित महिलांनी महिला आयोगासमोर धक्कादायक खुलासे केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या झालेल्या लैंगिक आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि अस्वस्थ करणारे खुलासे होत आहे. आणखी एका पीडितेने नुकताच राज्य महिला आयोगासमोर आपला जबाब नोंदवला आहे.

'अश्लील' पासवर्ड आणि मानसिक छळ

एका पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या युनिटमधील पासवर्ड अत्यंत अश्लील भाषेत ठेवण्यात आले होते. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रझा मेमन याने प्रशिक्षणादरम्यान पीडितेशी अश्लील संभाषण केले आणि तिला वारंवार केबिनमध्ये बोलावून मानसिक त्रास दिला. आरोपीने केवळ लैंगिक छळच केला नाही, तर पीडितेच्या धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्येही केल्याचा आरोप आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

फसवणूक आणि धर्मांतराचा कट

2022 मध्ये दानिश शेखचे लग्न झालेले असताना, त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या अहवालानुसार, फरार असलेली आरोपींपैकी एक आणि दानिश शेखची बहीण निदा खान हिने तक्रारदार महिलेच्या धर्माबद्दल अपमानजनक टिप्पणी केली आणि तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 

दानिश आणि तौसीफ यांनी पीडितेची बदनामी करणाऱ्या अफवा पसरवल्या. याबाबत पीडितने तक्रार देखील केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या तक्रारींकडे कंपनीच्या HR हेड अश्विनी चैनानी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. टीसीएस छळ प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आतापर्यंत 7 महिलांनी तक्रारीसाठी पुढाकार घेतला आहे.

(नक्की वाचा-  Cold Water Bath: थंड पाण्याने अंघोळीचे आश्चर्यकारक फायदे; मात्र या व्यक्तींसाठी ठरू शकते घातक)

अटकेतील आरोपींची नावे

नाशिक पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत खालील 7 जणांना अटक केली आहे. दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा रफिक मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अंसारी आणि HR हेड अश्विनी चैनानी यांचा यात समावेश आहे.  निदा खान ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.