Navi Mumbai : उलटी होईल! नवी मुंबईत पाव नाही, 'आळ्यांची लादी' विकली, बेकरीत आढळला धक्कादायक प्रकार, पाहा Video

Navi Mumbai Food Safety: नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना बेलापूरमध्ये उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai News : बेलापूरच्या बेकरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

Navi Mumbai Food Safety: नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना बेलापूरमध्ये उघड झाली आहे. बेलापूर सेक्टर 10 मधील . अंबिका स्वीट्स (Ambika Sweets) मधून विकत घेतलेल्या नरम पावाच्या लादीत (Bread Loaf) आळी आढळली. या प्रकरणात साबळे आणि वागळे कुटुंबीयांनी तक्रार केली होती.  या गंभीर प्रकरणाची तक्रार शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना बेलापूर विधानसभा चिटणीस ॲड. साईश जाधव यांच्याकडे केली होती..

बेकरीमध्ये धक्कादायक प्रकार

तक्रारीनंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पावाचा पुरवठा करणाऱ्या ईडन बेकरी (Eden Bakery), सेक्टर 36, करावे गाव, सीवूड्स येथे तातडीने पाहणी केली. या तपासणीत बेकरीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळले.

या बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधी होती. बेकायदेशीर कामगार कामावर होते. लायसन्स आणि हायजिनच्या (Hygiene) नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले होते.इतकंच नाही तर कामगार गुटखा, सिगारेट आणि तंबाखू (Tobacco) सेवन करत असल्याचेही निदर्शनास आले, असा दावा त्यांनी केला. युवासेना टीमने दुकानदारांना तात्काळ बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना तंबी दिली.

( नक्की वाचा : Kalyan News: अट्टल चोराला पकडताना कल्याणमध्ये मोठा राडा! इराणी वस्तीत पोलीस आणि नातेवाईकांमध्ये झटापट, Video )

या घटनेवर प्रतिक्रिया देताना ॲड. साईश जाधव म्हणाले की, "नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर नागरिकांनी  अन्नसुरक्षेच्या घटनांविरोधात जागरूक राहावे आणि तातडीने तक्रार नोंदवावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं. 

Advertisement

इथे पाहा Video

वडापावमध्ये आढळली होती पाव

खाद्यपदार्थात भलतेच पदार्थ मिसळून लोकांच्या जीवाशी खेण्याचे प्रकार काही नवे नाहीत. यापूर्वी रायगड जिल्ह्यातल्या खालापूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. खालापूर तालुक्यातील मुंबई- पुणे जुन्या हाय-वेवर चौक गावातील हॉटेलमधील वडापावमध्ये पाल आढळली होती.

येथील उजाला या प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. येथे काही दिवसांपूर्वी भरत वाघ या ग्राहकांच्या वडापावमध्ये पाल आढळली होती.  या घटनेनंतर येथील ग्रामस्थानी हॉटेल मालकाला जाब विचारला. त्यावेळी हॉटेल मालकाने  उडवाउडवीचे उत्तर दिली. ग्रामस्थांनी त्या हॉटेल मालकाला धारेवर धरले. जागरूक ग्रामस्थांनी हॉटेलमालकाला हॉटेल बंद करण्यास भाग पाडले होते.  

Advertisement
Topics mentioned in this article