Navratri 2025, Top 10 Garba: मुंबईतील टॉप 10 ठिकाणी गरबा आणि दांडिया नाईट्स; तिकीट किती?

Top 10 Garba, Dandia in Mumbai : प्रसिद्ध कलाकार फाल्गुनी पाठक, ऐश्वर्या मुजुमदार यांच्यासह विविध कार्यक्रमांचाही समावेश आहे. या कार्यक्रमांचे तिकीट बुकींग बुक माय शोवर करता येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navratri 2025 Dandia Garba

Navratri 2025: नवरात्री उत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. मुंबईतील गरबा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी भव्य गरबा नाईट्स आणि दांडिया महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध कलाकार फाल्गुनी पाठक, ऐश्वर्या मुजुमदार यांच्यासह विविध कार्यक्रमांचाही समावेश आहे. यातील काही प्रमुख ठिकाणे आणि त्यांच्या तिकिटांच्या दरांची माहिती खाली देण्यात आली आहे. या कार्यक्रमांचे तिकीट बुकींग बुक माय शोवर करता येणार आहे.

मुंबईतील प्रमुख गरबा ठिकाणे

1. डोम दांडिया नाईट्स 2025 (Dome Dandiya Nites 2025)

  • ठिकाण: डोम, एसव्हीपी स्टेडियम, मुंबई
  • तारीख: 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 799 रुपयांपासून पुढे

2. रंगताळी नवरात्री 2025 (Rangtaali Navratri 2025) ऐश्वर्या मुजुमदार

  • ठिकाण: जनरल अरुणकुमार वैद्य ग्राउंड, बोरिवली, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 943 रुपयांपासून पुढे

3. रेडियन्स दांडिया 2025 (Radiance Dandiya with Falguni Pathak) फाल्गुनी पाठक

  • ठिकाण: जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 1799 रुपयांपासून पुढे

4. शो ग्लिट्झ नवरात्री उत्सव 2025 (Showglitz Navratri Utsav 2025) गीता राबरी

  • ठिकाण: कोरा केंद्र मैदान क्र. 4, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 499 रुपयांपासून पुढे

5. इमेजिकामध्ये नवरात्री (Celebrate Navratri at Imagicaa)

  • ठिकाण: इमेजिक थीम पार्क, खोपोली, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 1500 रुपयांपासून पुढे

6. नवरंग गरबा 25 (Navrang Garba25)

  • ठिकाण: मॅरियट एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट्स, नवी मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 500 रुपयांपासून पुढे

7. रॉयल रास नवरात्री 2025 (Royal Raas Navratri 2025)

  • ठिकाण: सहारा स्टार, सफायर बँक्वेट हॉल, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 1180 रुपयांपासून पुढे

8. स्काय सिटी मॉल नवरात्री दांडिया नाईट्स (Sky City Mall Navratri Dandiya Nights)

  • ठिकाण: स्काय सिटी मॉल, बोरिवली, मुंबई
  • तारीख: 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025
  • तिकिटाचे दर: 1499 रुपये

9. प्रेरणा रास 2025 (Prerna Rass 2025)

  • ठिकाण: कालिदास मैदान, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 400 रुपयांपासून पुढे

10. रंगीलो रे (Rangilo Re) पार्थिव गोहिलसोबत

  • ठिकाण: नेस्को हॉल 4, मुंबई
  • तारीख: 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025
  • तिकिटाचे दर: 999 रुपयांपासून पुढे

Topics mentioned in this article