Mahakumbh Conclave : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये यावर्षी महाकुंभ मेळा होणार आहे. 2025 मधील हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. महाकुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. 'NDTV मराठी' नं कुंभमेळ्याच्या अर्थकारणावर विशेष परिषद आयोजित केली आहे. यामध्ये कुंभमेळ्यासंबंधी वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी बोलताना महाकुंभमेळ्याचा फक्त प्रयागराज किंवा उत्तर प्रदेशला नाही तर संपूर्ण देशाला फायदा होणार असल्याचं सांगितलं.
संपूर्ण जगभर उत्सुकता
कुंभमेळ्याच्या आयोजनाचा केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर कसा प्रभाव पडतो? या प्रश्नावर उत्तर देताना लोढा यांनी सांगितलं, 'भारतच नाही तर संपूर्ण जगात महाकुंभाबाबत उत्सुकता आहे. लोकांना त्याबाबत माहिती हवी आहे. कुंभमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही सहभाग आहे. हा आस्था आणि मोठ्या धार्मिक श्रद्धेचा विषय आहे. अर्थशास्त्र याचा छोटा बायप्रॉडक्ट आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाकुंभमधून रोजगार मिळणार?
महाकुंभची तयारी करताना त्यामधून किती उत्पन्न मिळणार याचा विचार केला जात नाही. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांच्या सुविधा आणि धार्मिक चालीरितींचं पालन कसं होईल याचा विचार केला जातो. भारतामध्ये हजारो वर्षांपासून संतांना सर्वोच्च स्थान देण्याची परंपरा आहे.
रामचरित मानसमध्येही आपण हे वाचलं आहे. राजा देखील त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ऋषींकडे पाहात असतं. ऋषींच्या आगमनानंतर उभे राहात असतं. त्याचप्रमाणे महाकुंभमध्ये संपूर्ण देशाचे संत, संन्यासी, ऋषी मुनी येत आहेत. त्यावेळी त्यांची सेवा करत असताना त्यांच्या सुविधांची काळजी घेतली जाईल. कुंभमेळ्यातील धार्मिक गोष्टींवर भर दिला जाईल.
( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
कुणाला मिळणार कुंभमेळ्याचा फायदा?
'महाकुंभ संपेल तेव्हा तो केवळ आठवणींच्या रूपात आपली छाप सोडणार नाही तर धार्मिक उन्नतीसाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत धार्मिक रीतिरिवाजांचे प्रसारण करण्यास मदत करेल. जोपर्यंत आर्थिक पुनरुज्जीवनाचा प्रश्न आहे, प्रत्येक चांगल्या कामाला देव स्वतःच आशीर्वाद देतो. मग तुम्हाला देवाचे आशीर्वाद नक्कीच मिळतील,' असं लोढा यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Mahakumbh Conclave : कसं असतं कुंभमेळ्यातील अर्थकारण? दिग्गजांनी घेतला महत्त्वाच्या मुद्द्यांचा धांडोळा )
संपूर्ण देशाला फायदा
प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा फायदा संपूर्ण देशाला होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. 'जुन्या आणि नवीन धार्मिक संसाधनांसह अर्थव्यवस्थेचा विकास पंतप्रधान मोदींच्या मनात आहे. एकीकडे धर्माचे पालन केले जाते आणि दुसरीकडे रोजगारही मिळतो, हे अद्भुत संघटन पीएम मोदींच्या विचारात आहे. या महाकुंभाचा केवळ उत्तर प्रदेश आणि प्रयागराजलाच नाही तर संपूर्ण देशाला फायदा होणार आहे,' असं त्यांनी सांगितलं.