जाहिरात

NDTV Marathi Manch: 'भारतीय टेनिसपटूंना संधी अन् मदतीची गरज', गोल्डन गर्ल ऋतूजा भोसले थेट बोलल्या

15 व्या वर्षी मी चॅम्पियन होती. त्यानंतर मग मागे वळून कधीच पाहीलं नाही असं ऋतुजा भोसले यांनी सांगितलं.

NDTV Marathi Manch: 'भारतीय टेनिसपटूंना संधी अन् मदतीची गरज', गोल्डन गर्ल  ऋतूजा भोसले थेट बोलल्या
  • ऋतुजा भोसले यांनी टेनिस हा खर्चीक आणि आव्हानात्मक खेळ असल्याचे सांगितले
  • २०२३ च्या एशियन गेम्समध्ये रोहन बोपन्ना सोबत मिश्र दुहेरीत त्यांनी गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं
  • टेनिस खेळाडूंसाठी संधी आणि मदतीची गरज असल्याचं ऋतुजा भोसले यांनी सांगितलं.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

टेनिसमध्ये देशाचं नाव उंचावणारी आणि गोल्डन गर्ल म्हणून ओळख असलेली ऋतुजा भोसले यांनी टेनिसबाबत आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.  'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. टेनिस हा खर्चीक खेळ आहे. त्यात मोठा खर्च होतो. सर्वांनाच तो परवडतो असं नाही. आता टेनिसमध्ये खूप बदल होत आहेत. त्यामुळे भारतीय टेनिस खेळाडूंना संधी आणि मदतीची गरज आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. टेनिस हा खेळ खूप टफ आहे. पण प्रयत्न करत राहील्यास तुम्हाला नक्कीच यश मिळतं. थोडं तुम्हाला ही सिद्ध करावं लागतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.  आपल्याला उशिरा का होईना पण सरकारची मदत मिळावी. त्यासाठी आधी सिद्ध करावं लागलं असं ही त्यांनी सांगितलं. 

यावेळी बोलताना त्यांनी 2023 च्या एशियन गेममधील गोल्ड मेडलचा ही किस्सा सांगितला. एशियन गेम्समध्ये मला मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना यांच्या बरोबर खेळण्याची संधी मिळाली. हा आपल्यासाठी मोठा गोल्डन चान्स होता. यावेळी रोहन बोपन्ना यांचे मोठं मार्गदर्शन मिळालं. ते पुण्यात काही काळ शिकले होते. त्यामुळे एशियन गेमच्या वेळी आम्ही दोघे ही मराठीतच बोलत होतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. आम्ही फायनलमध्ये पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही पहिलाच सेट हरलो. त्यावेळी खूप दडपण होते. पण रोहन यांनी मार्गदर्शन केलं. शिवाय आपण दोघांची साईड बदलूया असा सल्ला दिला. त्यावर मी खरोखर असं करून चालेला का? त्यावर त्यांनी  हो म्हणून उत्तर दिलं. शिवाय मला त्यावेळी आत्मविश्वास दिला आणि ही ट्रीक काम केली. आम्ही दुसरा सेट जलदगतीने जिंकलो. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहीले नाही. आम्ही एकहाती सामना जिंकला आणि एशियन गेममध्ये गोल्डमेडल मिळवलं. त्यानंतर आपल्याला गोल्डन गर्ल म्हणून संबोधलं गेलं अशी आठवण ही यावेळी सांगितलं. 

नक्की वाचा - NDTV Marathi Manch Live: पुणे ही महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झालीय, सुप्रिया सुळेंचा आरोप

 टेनिस खेळण्याची सुरूवात कशी झाली हे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कधी व्यावसायिक पणे टेनिस खेळण्याचं डोक्यात नव्हतं. वडीलांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं. पण त्यावेळी त्यांना ते जमलं नाही. मी एकूलती एक मुलगी होती. त्यांनी मला खेळात टाकलं. पण त्यांनी एक मजा म्हणून खेळात टाकलं होतं. मी नऊ वर्षाची असताना पहिली स्पर्धा खेळली. त्यावेळी जो संघर्ष होता तो मला आवडला. 13 वर्षाची असताना आई वडीलांनी विचारलं तुला टेनिसमध्येच करिअर करायचं का? त्यावेळी तेरा चौदा वर्षांची असताना मी मोठ्या मुलांसोबत टेनिस खेळायची. 15 व्या वर्षी मी चॅम्पियन होती. त्यानंतर मग मागे वळून कधीच पाहीलं नाही. तेव्हा पासून टेनिसचा प्रवास सुरू झाला असं त्यांनी आवर्जून सांगितला. 

Latest and Breaking News on NDTV

शाळेत शिक्षणात मी चांगली होती. टॉप थ्रीमध्ये मी नेहमी असायची असं ही त्यांनी सांगितलं. पण तुम्ही जे क्षेत्र निवडतात तिथे संघर्ष हा असतोच. टेनिस ग्लॅमर असलेला खेल आहे. श्रीमंत लोकांचा खेळ म्हणून ही त्याकडे पाहीलं जातं. मी मध्यमवर्गातील आहे. त्यामुळे या खेळातील खर्च त्यावेळी वाढत होता. तो तेवढा परवडत ही नव्हता. पण मी जागतिक ज्यूनिअर रँकींगमध्ये टॉपला होते. त्यामुळे अनेक देशांनी मला बोलावलं होतं. स्कॉलरशिप देवू केली होती. मी शिक्षण पूर्ण करावं अशी आईची इच्छा होता. त्यानंतर अमेरिकेत टेक्सास ए अँड एम विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिथे मला जायचं नव्हतं. पण नंतर ते विद्यापीठ किती चांगलं आहे हे समजल्यावर तिथे जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत टेनिसवर अधिक लक्ष केद्रीत केलं. ज्यावेळी अमेरिका सोडली त्यावेळी टॉप 5 मध्ये मी होती असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर भारतात आले. तिथून प्रोफेश्नल खेळ सुरू झाला. 

नक्की वाचा - NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल'

खेळ आणि दुखापत यांचं एक वेगळं नात आहे हे सांगायला ही ऋतुजा भोसले विसरल्या नाहीत. मला ही खुप  दुखापती झाल्या. माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तयारी केली. पण माझ्यात एक शिस्त आहे. त्याची मला खूप मदत झाली. प्रत्येक फिल्डमध्ये चढउतार असतात. दुखापतीमुळे मला ही त्रास झाला. ते माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण त्यातून ही मार्ग काढला. खेळात दुखापत होतेच. त्यामुळे आपल्या जवळ दुसरं ऑप्शन पाहीजे असं आई नेहमी सांगायची. त्यामुळे तू शिक्षण पूर्ण कर हा तिचा सल्ला होता असं ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सध्या आपण खेळावर लक्ष केंद्रीत केलं आहे. देशासाठी आणखी मेडल जिंकायची आहेत असं ही त्यांनी आवर्जून सांगितलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com