महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि एनडीटीव्ही मराठीला झालेल्या वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Unstoppable महाराष्ट्राचं स्पिरिट साजरं करणारं हे एकमेव व्यासपीठ आहे. अनेक दिग्गज या व्यासपिठावर त्यांचं या विषयातील चिंतन मांडत आहेत. त्याचा फायदा हा राज्याला होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झाले होते. त्यांनी या कार्यक्रमात आगामी काळात महाराष्ट्राचं व्हिजन काय असावं याबाबत चिंतन केले.
Unstoppable महाराष्ट्राचा रोडमॅप
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आर्थिक विकासामध्ये GDP हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधेचं 22 ते 24 टक्के योगदान आहे. या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. त्यात महाराष्ट्रा नंबर 1 राहिल असा विश्वास आहे. सर्व्हिस क्षेत्रातही महाराष्ट्र नंबर 1 आहे. कृषी क्षेत्रातही महाराष्ट्रानं अनेक विक्रम केले आहे. या क्षेत्रात अजून काम करणे आवश्यक आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे हे आदिवासी क्षेत्रातील आहेत. वनवासी आणि आदिवासी क्षेत्रातील विकासाचं मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत आहे. आगामी काळात या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याच पद्धतीनं प्रत्येक Aspirant जिल्हा आणि तालुक्याचा विचार करणे आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
पाणी हा कळीचा मुद्दा
महाराष्ट्रात पाणी हा सर्वात कळीचा मुद्दा. येणाऱ्या काळात सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचे गरज आहे. आपण जी धरणं बांधली त्यामध्ये जे पाणी साठवलं त्याचा योग्य उपयोग होतो की नाही हे पाहिलं पाहिजे. हे पाणी शेतकऱ्यांना पोहचवण्यास पहिलं प्राधान्य द्यायला हवं. विदर्भातील तलाव खोदून त्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जलसंधारण हा महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण विकासाला सुखी समृद्ध करायचं असेल तर सिंचनाबरोबर कोणत्या पिकामध्ये सुखी समृद्ध होणार यावर चिंतन होणे आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
.इथेनॉलवरचा वापर वाढला पाहिजे. त्याचबरोबर हायड्रोजनकडंही राज्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. हायड्रोजन हे भविष्य आहे. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात मोठा कचरा आहे. त्याचे रिसायकलिंग करुन हायड्रोजन करु शकतो. मुंबई ते पुणे रस्त्यावर हायड्रोजनचे पंप आणि वाहन सुरु करण्याचा विचार आहे, असं गडकरींनी सांगितलं.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch Conclave: 'कोणासाठीही पॉलिटिकल स्पेस..', CM फडणवीसांच्या विधानाने विरोधकांची धाकधुक वाढणार! )
आपण कांदा देशभर पुरवतो. पण, कांद्याचे स्टोरेज वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सवलती देणं आवश्यक आहे. त्यामुळे कांद्याची साठवण होईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी काळात द्राक्षाची जागतिक स्तरावर जात विकसित करणे त्याची निर्यात करणे आवश्यक आहे. संत्रा उत्पादन कसं वाढवता येईल याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याची इकोनॉमी विकसित करण्याची आवश्यक आहे. मच्छिमार 100 नॉटिकल मैल समुद्रात गेले तर त्यांचं सागरी उत्पादन वाढू शकते. मासेमारीच्या माध्यमातून ही इकोनॉमी 2 लाख कोटींचे ठेवण्याचे लक्ष्य आहे.
कोकणात आंबा आहे. पण, आंब्याचे कोल्ड स्टोरेजची कमी आहेत. त्यांना मिळणाऱ्या वीजेचे दर जास्त आहेत. त्यासाठी सोलारमध्ये ऊर्जा देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रचा निर्यातीमधील पहिला क्रमांक कायम ठेवायचा आहे.