
Nidarshana Gowani : परोपकारामुळे आपल्याकडील संपत्ती कमी होत नाही, हा परोपकार आपल्या आत्माची समृद्धी वाढवतो हा विचार जपणाऱ्या निदर्शना गोवानी या समाजात बदल घडावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. स्वामी विवेकानंद यांच्यावर श्रद्धा असलेल्या निदर्शना यांनी त्यांच्या तत्त्वांचे अनुकरण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सेवा ही निस्वार्थ असावी, हे मूल्य बाळगणाऱ्या निदर्शना समाजामध्ये चांगले बदल घडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. निदर्शना हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून समाजसेवा, उद्योजिका, कवयित्री, गायिका अशा विविध भूमिका त्या लीलया पार पाडत असतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निदर्शना यांनी म्हटले की, "स्वत:पुरता विचार न करता आपण समाजाचे देणे लागतो हा विचार प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. देशातील सर्वसामान्य जनतेची निस्वार्थपणे सेवा करणे हीच खरी संपत्ती आहे." निदर्शना यांना समाजसेवेच्या विचारांचे हे बाळकडू कुटुंबातूनच लाभले आहे. निदर्शना यांचे एक आजोबा हे पद्मभूषण पुरस्कार विजेते कुंजलाल दुबे असून दुसरे आजोबा हे इंदोर आणि ग्वाल्हेरमधील नागरिकांसाठी कर्करोगावर उपचारांची मुहूर्तमेढ रोवणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोघांनीही सर्वसामान्यांचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने आपले जीवन व्यतीत केले होते. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. मात्र असे करत असताना त्यांनी आपली कर्तव्ये, मूल्य, निष्ठा यांना कधीही तिलांजली दिली नाही.
(नक्की वाचा: Advantage Assam 2.0 Summit : अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार, गौतम अदाणींची मोठी घोषणा)
आजोबांचा वारसा पुढे नेत असताना निदर्शना यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत महिलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल त्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे काम केले आहे. तृतीयपंथी, अॅसिड हल्ला पीडिता, दिव्यांग यांच्यासाठी निदर्शना यांनी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहे. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीही त्या अग्रेसर असतात. समाजाचे भले व्हावे यासाठी झटणाऱ्या अनेकांसाठी निदर्शना गोवानी या आदर्श व्यक्तिमत्त्व बनल्या आहेत. निदर्शना यांनी HPV ची 10 हजार मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घेतला होता. ही लस गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रभावी लस आहे. समाजकार्यात झोकून दिले असताना निदर्शना यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. कमला मिल्सचे मालक असलेल्या रमेश गोवानी यांची पत्नी म्हणून, त्रिशाला आणि रुद्रांश यांची आई म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात कुठेही कसूर ठेवली नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world