अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Petrol-Diesel Latest Update : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला.त्यानंतर पुण्यातही इंधन दर वाढल्याची माहिती समोर आली होती. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता.अशातच आता पुण्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवांना पेव फुटलं आहे. सोशल मीडियावर या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या समस्येबाबत जितेंद्र डुडी काय म्हणाले?
"राज्यभरात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. पेट्रोलचा तुटवडा आहे, अशा अफवा पसरवल्या जातात. पुणे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? अफवांमुळे नागरिक भयभीत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आज सकाळी दुसऱ्या जिल्ह्याची याबाबतची बातमी बघितली होती. त्यानंतर आम्ही आज सकाळी साडे अकरा दरम्यान डिलर असोसिएशनसोबत बैठक घेतील. ज्या कंपनी आहेत, एचपीसीएल,आयओसील आणि बीपीसीएलच्या प्रतिनिधींसोबत आमची बैठक झाली. मी स्पष्टपणे सांगतो की, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा पुणे जिल्ह्यात नाही आहे. कमर्शियल, इंडस्ट्रियल कोणत्याही प्रकारचा नाही",असं जितेंद्र डुडी यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."
"तसच त्यामध्ये कट शॉट करणे, कमी प्रमाणात देण्याचेही आदेश आलेले नाहीयत. सोशल मीडियाद्वारे काही लोक विनाकार संभ्रम निर्माण करण्याच प्रयत्न करत आहेत. मी स्पष्टपणे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की शासनाद्वारे अशी कोणत्याही प्रकारची बंदी आणली जाईल किंवा तुटवडा असेल, तर जिल्हा प्रशासनाकडून तशाप्रकारीच माहिती देण्यात येईल. सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारची अफवा असो, त्याला बळी पडू नये. पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या डिझेल, पेट्रोल तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पुणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. काही ठिकाणी आम्हाला कडक पाऊल उचलावं लागणार आहे.कारण चुकीची बातमी आणि महिती लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण करते",असंही जितेंद्र डुडी म्हणाले.