Sangli News: सांगलीच्या 'या' गावात घडतात अघटित घटना..एक थेंबही दूध विकलं जात नाही, कारण वाचून हादरूनच जाल

गावात दररोज एक हजार लिटर दुधाचे उत्पादन होतं.मात्र दुधाचा एक थेंब देखील विक्री केला जात नाही.याशिवाय गावात दूध विक्रीचा व्यवसाय देखील नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sangli Saspade Milk Production News

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli Saspade Village Milk Issue : गावात दररोज एक हजार लिटर दुधाचे उत्पादन होतं.मात्र दुधाचा एक थेंब देखील विक्री केला जात नाही.याशिवाय गावात दूध विक्रीचा व्यवसाय देखील नाही.शेकडो वर्षांपासून दूध विक्री न करण्याची प्रथा गेल्या पाच पिढ्यांपासून सांगलीच्या सासपडे या गावात जोपासली जात आहे.दूध विक्रीचा व्यवसाय केल्यास संबंधित कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात,अशी श्रद्धा सासपडे गावात दूध विक्रीबद्दल आहे.दूध विक्री न करण्याच्या सासपडे गावाची अनोखी प्रथा नेमकी काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

गावात दुधाचं मुबलक उत्पादन,पण गावात दुधाची एकही डेअरी नाही. दररोज एक हजार लिटर दुधाचं उत्पादन होतं. सासपडे गावात थेंबभर देखील दुधाचा विक्री होत नाही. दूध विक्री न करता एकमेकांना दूध उसने देण्याची परंपरा आहे. दूध विक्री केल्यास डोंगराई देवीचा जनावरांवर प्रकोप होतो,अशीही अंधश्रद्धा या गावात असल्याचं सांगितलं जातं. शेकडो वर्षांपासून दूध विक्री न करण्याची परंपरा पाळली जात आहे. 

Advertisement

सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील असलेलं सासपडे गाव त्यांची अनोख्या परंपरा जोपासण्यासाठी आजही प्रसिद्ध आहे.अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेतीला जोडधंदा म्हणून गाई-म्हशी देखील पाळल्या जातात.पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातल्या गाई म्हशीचे दूध हे विकलं जात नाही,अशी प्रतिक्रिया सरपंच महादेव पोळ यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Video: तुम्हीही ऑफिसमध्ये 'या' 10 गोष्टींवर गॉसिप करता? आताच सावध व्हा..कॉर्पोरेटमध्ये होईल मोठं नुकसान

दुधापासून बनणारे तूप देखील विकले जात नाही

सासपडे गावात एक थेंब देखील दूध विक्री केलं जात नाही.त्यामुळे गावात दुधाची एक डेअरी देखील नाही.मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, दुधाचं काय केलं जातं. तर सासपडे गावात दूध एकमेकांना उसने म्हणून दिलं जातं.इतकंच नव्हे तर गाई म्हशींचा दुधापासून बनणारे तूप देखील विकले जात नाही,तुपाच्या बदल्यात तेल घेतलं जातं,अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थ सुहास पोळ यांनी दिली आहे. सासपडे गावात जवळपास 80 % हे पोळ भाऊबंदकी राहते.पोळ घराण्यामध्ये कोणीही दूध विक्रीचा प्रयत्न केल्यास,त्या कुटुंबातील गाई-म्हशी दूध द्यायला बंद करतात,इतकंच नव्हे तर त्या गाई म्हशींच्या बाबतीत अघटीत घटना देखील घडतात,असा गावकऱ्यांचा समज आहे.

सासपडे गावाला मल्लांची मोठी परंपरा होती,शिवकालीन काळापासून इथले मल्ल प्रसिद्ध होते.गावातल्या पैलवानांना गावात पौष्टिक आहार मिळावा म्हणून दूध दिलं जायचं.ते कायमस्वरूपी मिळत राहो,म्हणून गावातल्या भागुबाई यांनी डोंगराई देवीला साकडे घातले.त्यामुळेच गावातलं दूध गावातल्या पैलवानांना मिळण्यासाठी डोंगराई देवीने हे एक प्रकारचं वरदान दिल्याचं गावातील ज्येष्ठांकडून सांगण्यात येत.

नक्की वाचा >> AC Water Benefits: तुम्हीही फेकून देता AC मधून बाहेर पडणारं पाणी? पैसै अन् मेहनतही वाचेल, फक्त 'असा' करा वापर

सासपडे गावाची देवी म्हणून डोंगराई देवीची ओळख आहे.कडेगावपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरावर डोंगराई देवीचे मंदिर आहे.या देवीची सासपडे गावातील भागुबाई असीम भक्त होत्या.त्यामुळे डोंगराई देवीला त्यांनी मागितलेलं वरदान आजही कायम आहे.दूध विक्रीसाठी डोंगराई देवीला गावातल्या अनेकांनी कौल लावला.मात्र तो मान्य न झाल्याचं गावकरी सांगतात.गावामध्ये कोणीही आपल्या गाई म्हशीचे दूध विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या जनावरांच्या बाबतीत अघटीत घटना घडतात.

Advertisement

त्यामुळे गावात कोणीही दूध विक्री किंवा दूध विक्रीचा व्यवसाय करत नाही. गावात दररोज किमान 1000 लिटर दुधाचे उत्पादन होतं.पण गावातल्या गाई-म्हशींचा दूध विकलं जात नाही.दूधाची गरज भासल्यास ते बाहेरून विकत आणलं जातं.शिवकालीन इतिहासापासून आजपर्यंत सासपडे गावात दूध विक्री व्यवसाय केला जात नाही,ज्यांनी केला त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले,असं गावकरी सांगतात.