चांदीपुरा व्हायरसमुळे गुजरातमध्ये वाढली भीती; आतापर्यंत 27 बालकांचा मृत्यू, रुग्णसंख्या 73 वर

गुजरातमध्ये (Gujrat Chandipura Virus) चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
गांधीनगर:

गुजरातमध्ये (Gujrat Chandipura Virus) चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. रविवारी सूरतमध्ये संशयास्पद रुग्ण आढळला. येथील एका झोपडपट्टी भागात राहणाऱ्या अकरा वर्षीय मुलगी तापाने फणफणली होती आणि उलट्या होत असल्याने तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याशिवाय राजकोटमध्येही आणखी एक संशयास्पद रूग्ण आढळून आला आहे. दोन्ही मुलांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. 

दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 73 पर्यंत पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. सध्या 41 रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतच वडोदरामधील सयाजी रुग्णालयातील चांदीपुरा व्हायरसमुळे एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. 

नक्की वाचा - लेन्सने वाट लागली, अभिनेत्रीचा डोळा थोडक्यात वाचला; असह्य वेदना अन् दिसणे बंद झाल्याने झाली हैराण

सरकारने जारी केली हेल्पलाइन नंबर...
आतापर्यंत या व्हायरसचा परिणाम ग्रामीण भागात पाहायला मिळत होता, मात्र आता अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सूरतसारख्या मोठ्या शहरांवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. चांदीपुरा व्हायरससाठी सरकारने एक हेल्पलाइन नंबर 104 सुरू केलं आहे. यावर व्हायरससंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. 

चांदीपुरा व्हायरस गुजरातच्या गाव आणि शहरांमधील भागांमध्ये पसरत असल्याचं दिसत आहे. या व्हायरसची लागण अधिकांश लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागातील परिस्थितीवर भारत सरकारने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत गुजरातमध्ये 344 बालतज्ज्ञांची आवश्यकता होती. मात्र केवळ 30 डॉक्टरांची पदं भरण्यात आली आहेत आणि अद्यापही 46 जागा रिकामी आहेत. 

Advertisement