Ola Uber strike: ओला- उबर चालकांच्या संपाचा फटका, अनेकांचे हाल, एअरपोर्टने जारी केली सूचना

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ओला आणि उबर चालकांनी संप पुकारला आहे. संपाचा बुधवारी दुसरा दिवस होता. या संपाचा आता परिणाम मुंबईत दिसू लागला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होताना दिसत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने याबाबत एक सुचना जारी केली आहे. त्यात त्यांनी अॅप बेस टॅक्सी चालकांचा संप सुरू आहे.त्यामुळे प्रवासाची योग्य ती सोय करावी अशी सुचना करण्यात आली आहे. 

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतत आहे.  यामध्ये बाईक टॅक्सीवर पूर्णपणे बंदी आणावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासोबत ठराविक भाडे ठरवावे, मीटर टॅक्सीप्रमाणे ओला उबेरला देखील भाडं मिळावं, कॅब आणि टॅक्सी चालक बोर्ड कार्यक्षम करावं या मागण्या आहेत. त्यासाठी आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालक आंदोलनासाठी बसले आहेत. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray: ठाकरे आले, शिंदे अस्वस्थ झाले! फोटोसेशन वेळी नक्की काय झाले?

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. संपावर असलेल्या ओला उबेर चालकांकडून, जे या संपात सहभागी झाले नाहीत अशा टॅक्सींची अडवणूक केली जात आहे. अशा अनेक घटना समोर येत आहेत. ट्वीटरवर याबाबत अनेक प्रवाशांनीही तक्रारी केल्या आहेत. ओला उबर गाडी रस्त्यावर दिसताच त्या अडवल्या जात आहेत. शिवाय प्रवाशांनाही खाली उतरवण्यात येत आहे. या संपाच फटका मात्र आता मुंबईकरांना बसताना दिसत आहे. 

नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार

ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.  रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर  ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या वाहन चालकांनी मंगळवार पासून संप पुकारला आहे. 

Advertisement