जाहिरात

Uddhav Thackeray: ठाकरे आले, शिंदे अस्वस्थ झाले! फोटोसेशन वेळी नक्की काय झाले?

उद्धव ठाकरे येताच नीलम गोऱ्हे खुर्चीतून उठल्या. नीलम गोऱ्हे नेमक्या शिंदेंच्याच बाजूच्या खुर्चीत बसल्या होत्या.

Uddhav Thackeray: ठाकरे आले, शिंदे अस्वस्थ झाले! फोटोसेशन वेळी नक्की काय झाले?
मुंबई:

ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येतात तेव्हा काय घडलं? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे बाजूबाजूला उभे राहतात तेव्हा काय घडलं? आणि एकनाथ शिंदेंच्या शेजारच्या खुर्चीत बसण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी काय केलं? याची चर्चा आता एका फोटोसेशनमुळे होवू लागली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रानं आवर्जून पाहावं असं हे दृष्य होतं. निमित्त होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचे. त्यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने- सामने आले होते. त्यावेळी या दोघांचे ही चेहऱ्यावरचे भाव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.  

फोटो काढण्यासाठी सर्व जण रेडी होते. सगळ्यांनी चेहऱ्यावर हसू होतं. खुर्च्या सावरुन नेते बसले ही होते. त्याच वेळी शिंदे-ठाकरे समोरासमोर आले. प्रसंग मोठा बाका होता. ही सगळी गंमत होती आज विधानभवनात झालेल्या फोटोसेशनची.याच फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले होते. पुढे काय घडलं, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. पण आधी या फोटोसेशनची सुरुवात कशी झाली ते समजून घेवू. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार

सगळ्यात आधी अजित पवार आले.आणि दादांनी आपली खुर्ची सगळ्यात आधी पकडली. दादांच्या पाठोपाठ विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आल्या. हे सगळे नेते खुर्चीवर स्थिरस्थावर होताच पाठीमागून मुख्यमंत्री आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि राम शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसले. अंबादास दानवेंचा आज विधानपरिषदेतून निरोपसमारंभ झाला. त्यामुळे दानवे आले आणि मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसले. तोपर्यंत पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि इतर आमदार फोटोसाठी पाठीमागे उभे राहिले.

नक्की वाचा - Pandharpur News: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले

तेवढ्यात एकनाथ शिंदे फोटोसेशनसाठी आले. एकनाथ शिंदेंनी धावत धावत आपली खुर्ची पकडली. कॅमेऱ्याची फ्रेम सेट झाली. फोटोग्राफर म्हणाले आता हलू नका. फोटो काढून सगळे जण उठले. पण तेवढ्यात पाठीमागून उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे आल्यावर पुन्हा फोटो काढायचं ठरलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना खुर्चीवर बसवण्यासाठी बोलावलं मात्र उद्धव ठाकरे सरळ चालत पुढे गेले. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या जवळ पोहोचताच एकनाथ शिंदेंनी चष्मा नीट करुन पुन्हा लावला. शिंदेंनीही ठाकरेंकडे पाहिलं नाही, ठाकरेंनीही शिंदेंकडे पाहिलं नाही.

नक्की वाचा - Big News: 'तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे', CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर

उद्धव ठाकरे येताच नीलम गोऱ्हे खुर्चीतून उठल्या. नीलम गोऱ्हे नेमक्या शिंदेंच्याच बाजूच्या खुर्चीत बसल्या होत्या. नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. प्रसंग बडा बाका होता. उद्धव ठाकरे शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसणार का, याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता असताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसायला नकार दिला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही एकमेकांकडे पाठच होती. अंबादास दानवे आले आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या जागेवर चलण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यालाही नकार दिला. अखेर एका बाजूला एकनाथ शिंदे मध्ये नीलम गोऱ्हे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे खुर्चीत बसले.

नक्की वाचा - Mumbai News: अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार, ​परळ स्थानकात फास्ट लोकल थांबणार?

उद्धव ठाकरे खुर्चीवर बसताच एकनाथ शिंदेंनी खुर्चीचा खुट्टा मजबूत आहे ना ते तपासून घेतलं.  शिंदे खुर्चीत पुन्हा सरसावून बसले आणि हाताची घडी घातली. शिंदेंनी उजव्या बाजूला पाहिलं नाही, ठाकरेंनी डाव्या बाजूला बघितलं नाही. उद्धव ठाकरेंनी शेजारी बसलेल्या नीलम गोऱ्हेंशी थोड्या गप्पा मारल्या.पुन्हा फोटो काढले. फोटो काढून होताच शिंदे खुर्चीतून लगेचच उठले आणि निघून गेले. पाठोपाठ उद्धव ठाकरेही निघाले. मुख्यमंत्री फडणवीसांना शेकहँड करुन उद्धव ठाकरेही निघाले. अशा प्रकारे फोटोसेशनचा सोहळा संपला. मात्र एक जबरदस्त फोटो मिळणार मिळणार असं वाटत असतानाच राहून गेला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com