जाहिरात

'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार

Palghar Crime: डहाणू तालुक्यातील लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण अद्याप ताजे आहे. त्यातवेळी याच परिसरामधून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी  एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार
Palghar Crime: डाहणू तालुक्यातील आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे.
डहाणू:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar Crime: डहाणू तालुक्यातील लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण अद्याप ताजे आहे. त्यातवेळी याच परिसरामधून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी  एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. डहाणूच्या कासा भागात एका तरुणीवर घरात घुसून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, या विकृत कृत्याच्या निषेधार्थ कासा, चारोटी आणि वरोती या 3 मोठ्या गावांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला आहे. वाढता तणाव पाहता पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची भरबाजारातून दिंड काढली आहे.

काय आहे प्रकरण?

कासा परिसरामध्ये घडलेली ही घटना अत्यंत चीड आणणारी आहे. पीडित तरुणी आपल्या घरात झोपलेली असताना, इजाज नवाब खाटिक नावाच्या एका विकृत तरुणाने तिच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तरुणी एकटी असल्याचा फायदा उठवत इजाजने तिच्याशी बळजबरी करून गैरवर्तन करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तरुणीने अजिबात धीर न खचू देता प्रचंड प्रसंगावधान राखले आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )

शेजारील महिलांनी दिला चोप

तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरामधील धाडसी महिला तात्काळ तिच्या घराच्या दिशेने धावून आल्या. महिलांना पाहताच आरोपी इजाज नवाब खाटिक याची बोलती बंद झाली. घटनास्थळी गोळा झालेल्या महिलांनी आणि नागरिकांनी आरोपीला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता जागीच पकडले आणि त्याची चांगलीच धुलाई केली. डहाणू भागामध्ये काही दिवसांपूर्वीच एका तरुणीसोबत घडलेली लव्ह जिहादची घटना ताजी असल्याने, या नव्या प्रकारामुळे लोकांच्या संयमाचा बांध सुटला.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण डहाणू तालुक्यात पसरली आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी हजारो संतप्त नागरिकांनी थेट कासा पोलीस ठाण्याबाहेर धाव घेतली. पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाल्याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

(नक्की वाचा : Titwala News: टिटवाळ्यात पार्किंगवरून छळवणुकीचा कहर; 'धुरंदर ग्रुप'च्या त्रासामुळे डॉक्टर विकणार 1 कोटींचे घर )

आरोपी सराईत गुन्हेगार, काढली दिंड

कासा पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी इजाज नवाब खाटिक याला अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपी इजाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही महिलांचा विनयभंग आणि छेडछाड केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांत दाखल आहेत. 

नागरिकांमधील रोष कमी करण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची परिसरातून दिंड काढली. दरम्यान, कासा, चारोटी आणि वरोती मधील व्यापारी आणि नागरिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com