Swapnil Kusale on Hindu Nation : पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेनं नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. या ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मेडल मिळवणारा तो एकमेव मराठी खेळाडू आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारा स्वप्नील सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. पुण्यात मंगळवारी झालेल्या एका दहीहंडी कार्यक्रमात स्वप्नील प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यानं थेट 'हिंदू राष्ट्र' या विषयावर वक्तव्य केल्यानं त्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला स्वप्नील?
पुण्यातील बालेवाडी-हिंजवडी परिसरात झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात स्वप्नील प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वप्नील म्हणाला,' बालवणकर दादांनी मला इथं बोलावलं त्यासाठी त्यांचे आभार. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे. मी यापूर्वी अशा कार्यक्रमात सहभागी झालो नव्हतो. मला सरावातून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ मिळत नव्हता.
( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
गोविंदांना दिला सल्ला
स्वप्नील कुसाळेनं यावेळी बोलताना गोविंदांना आरोग्य जपण्याचा सल्ला दिला. 'इतकं वर जाऊन दहीहंडी फोडणं हे मोठ्या कष्टाचं काम आहे. त्यासाठी शरीर सुदृढ राहावं म्हणून चांगलं सकस अन्न खा. बाहेरचं काही खाऊ नका. आपलं आरोग्य जपा,' असं स्वप्नीलनं सांगितलं.