जाहिरात

'.... तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल', ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Swapnil Kusale on Hindu Nation : पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.

'.... तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल', ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Swapnil Kusale
पुणे:

Swapnil Kusale on Hindu Nation : पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेनं नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. या ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मेडल मिळवणारा तो एकमेव मराठी खेळाडू आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारा स्वप्नील सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. पुण्यात मंगळवारी झालेल्या एका दहीहंडी कार्यक्रमात स्वप्नील प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यानं थेट 'हिंदू राष्ट्र' या विषयावर वक्तव्य केल्यानं त्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला स्वप्नील?

पुण्यातील बालेवाडी-हिंजवडी परिसरात झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात स्वप्नील प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वप्नील म्हणाला,' बालवणकर दादांनी मला इथं बोलावलं त्यासाठी त्यांचे आभार. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे. मी यापूर्वी अशा कार्यक्रमात सहभागी झालो नव्हतो. मला सरावातून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ मिळत नव्हता.

यासारख्या सणांच्या माध्यमातून आपण हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण बोलतो की जय श्रीराम... या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल.'

( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
 

गोविंदांना दिला सल्ला

स्वप्नील कुसाळेनं यावेळी बोलताना गोविंदांना आरोग्य जपण्याचा सल्ला दिला. 'इतकं वर जाऊन दहीहंडी फोडणं हे मोठ्या कष्टाचं काम आहे. त्यासाठी शरीर सुदृढ राहावं म्हणून चांगलं सकस अन्न खा. बाहेरचं काही खाऊ नका. आपलं आरोग्य जपा,' असं स्वप्नीलनं सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
'.... तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल', ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Maharashtra Dighi port biggest industrial city will give Employment opportunities
Next Article
तब्बल 10 लाख प्रत्यक्ष रोजगार, केंद्राचा नवा प्रकल्प; महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी बातमी