Ghatkopar station : घाटकोपर स्टेशन प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला प्रवासी, पुढे काय घडलं?

घाटकोपर स्टेशनवर लोकलच्या खाली एक प्रवासी अडकला होता. धावत्या लोकलमधून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो त्या फटीत अडकला होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Ghatkopar Station Train Accident : मुंब्रा स्टेशनवर लोकलमधून पडल्यानं 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ घाटकोपर स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घाटकोपर स्टेशनवर लोकलच्या खाली एक प्रवासी अडकला होता. धावत्या लोकलमधून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो त्या फटीत अडकल्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा अपघात रात्री 8.02 वाजता मध्य रेल्वेवरुन घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकवर झाला होता. या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अद्याप या प्रवाशाची ओळख पटू शकलेली नाही. हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून घाटकोपर स्थानकावर उतरत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत अडकला.

यानंतर स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. लोकल थांबवून ठेवण्यात आली. हा प्रवासी साधारण ५० वर्षांचा असल्याचं सांगितलं जात आहे. तो धावत्या लोकलमध्ये उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो फटीत अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा छातीकडील भाग या फटीत अडकला होता. लोकल थांबल्यानंतर कसं बसं त्याला बाहेर काढण्यात आलं. तातडीने तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.   

Advertisement

नक्की वाचा - Vikhroli Flyover : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, इंधन अन् वेळही वाचणार; आजपासून विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला

मुंब्रा-दिवा स्टेशनदरम्यान अपघातात चार जणांचा मृत्यू...
९ जून रोजी मुंब्रा-दिवा स्टेशनदरम्यान झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळी ही दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. 

Topics mentioned in this article