Petrol Diesel Price Today: जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर नक्की तपासून घ्या. देशातील अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी आज (19 मे) सकाळीच नवीन दर जाहीर केले आहेत. काही शहरांमध्ये किमतीत किरकोळ बदल पाहायला मिळाला, तर अनेक ठिकाणी दर जवळपास स्थिर आहेत.
वेगवेगळ्या राज्यामधील VAT (व्हॅट) आणि स्थानिक करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात, हे लक्षात घ्या. यामुळेच मुंबईपासून दिल्ली, जयपूर, पाटणा आणि हैदराबादपर्यंत अनेक शहरांमध्ये नवीन किमती लागू झाल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेल किती महाग झाले आहे की नाही?
गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी तपासून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवीन दर:
- मुंबई: पेट्रोल 0.91 पैशांनी वाढून नवे दर 107.59 प्रति लिटर आणि डिझेल 0.94 पैशांनी महाग होऊन नवे दर 94.08 प्रति लिटर आहेत.
- दिल्ली: पेट्रोल 0.87 पैशांनी महाग होऊन आजचे दर 98.64 प्रति लिटर आणि डिझेल 0.91 पैशांनी वाढून आजचे दर 91.58 प्रति लिटर आहेत.
- कोलकाता: पेट्रोल 1 रुपयाने वाढून आजचे दर 109.70 प्रति लिटर आणि डिझेल 0.94 पैशांनी वाढून आजचे दर 96.07 प्रति लिटर आहेत.
- चेन्नई: पेट्रोल 0.79 पैशांनी महाग होऊन आजचे दर 104.46 प्रति लिटर आणि डिझेल 0.86 पैशांनी वाढून आजचे दर 96.11 लिटर आहेत.
- गुरुग्राम: पेट्रोल 0.82 पैशांनी वाढून आजचे दर 99.29 प्रति लिटर आणि डिझेल 0.86 पैशांनी महाग होऊन आजचे दर 91.80 प्रति लिटर आहेत.
- नोएडा: पेट्रोल 1.15 रुपयांनी वाढून आजचे दर 98.91 प्रति लिटर आणि डिझेल 1.22 रुपयांनी वाढून आजचे दर 92.21 प्रति लिटर आहेत.
- बंगळुरू: पेट्रोल 0.95 पैशांनी महाग होऊन आजचे दर 107.12 प्रति लिटर आणि डिझेल 0.94 पैशांनी वाढून आजचे दर 95.04 प्रति लिटर आहेत.
- भुवनेश्वर: पेट्रोल 0.52 पैशांनी वाढून आजचे दर 105.09 प्रति लिटर आणि डिझेल 0.57 पैशांनी महाग होऊन आजचे दर 96.68 प्रति लिटर आहेत.
- चंदीगड: पेट्रोल 0.83 पैशांनी वाढून आजचे दर 98.10 प्रति लिटर आणि डिझेल 0.84 पैशांनी वाढून आजचे दर 86.09 प्रति लिटर आहेत.
- हैदराबाद: पेट्रोल 0.99 पैशांनी महाग होऊन आजचे दर 111.88 प्रति लिटर आणि डिझेल 0.99 पैशांनी वाढून आजचे दर 99.95 प्रति लिटर आहेत.
- जयपूर: पेट्रोल 1.71 रुपयांनी वाढून आजचे दर 109.32 प्रति लिटर आणि डिझेल 1.60 रुपयांनी महाग होऊन आजचे दर 94.50 प्रति लिटर आहेत.
- लखनौ: पेट्रोल 0.68 पैशांनी वाढून आजचे दर 98.40 प्रति लिटर आणि डिझेल 0.72 पैशांनी वाढून आजचे दर 91.73 प्रति लिटर आहेत.
- पाटणा: पेट्रोल 1.10 रुपयांनी महाग होऊन आजचे दर 110.02 प्रति लिटर आणि डिझेल 1.08 रुपयांनी वाढून आजचे दर 96.05 प्रति लिटर आहेत.
4 वर्षांनंतर वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी (15 मे) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती. सुमारे 4 वर्षांनंतर इंधनाच्या किमतीत इतका मोठा बदल पाहायला मिळाला आहे. याआधी एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. तर मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने प्रति लिटर 2 रुपयांची कपात केली होती.
(नक्की वाचा : Palghar Accident: एक राँग टर्न, 13 जणांचा The END, पालघर अपघाताचे धक्कादायक कारण; चालकाच्या त्या मस्तीनेच...)
पेट्रोल-डिझेलच्या किमती का बदलतात?
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर, डॉलर-रुपया विनिमय दर (Exchange Rate) आणि राज्यांचा VAT (व्हॅट) या आधारावर ठरवल्या जातात. याच कारणामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात इंधनाचे दर वेगवेगळे असतात.