Mumbai Cruise Terminal: 10 लाख प्रवासी क्षमता, 72 चेक-इन पॉइंट; भारतातील सर्वात मोठं क्रुझ टर्मिनलचं उद्घाटन

हे टर्मिनल सुरू झाल्यामुळे मुंबई केवळ भारतातच नाही तर आशियातील एक प्रमुख क्रूझ टूरिजम डेस्टिनेशन म्हणून नावारुपास येईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबईतील या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची खासियत काय आहे?

Mumbai Cruise Terminal: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 20 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईच्या बॅलार्ड पिअरवरील अत्याधुनिक मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं (MICT)  उद्घाटन करणार आहेत. हे टर्मिनल क्रूझ भारत मिशनअंतर्गत तयार करण्यात आलं आहे आणि या क्रूझमुळे भारताला जागतिक क्रूझ पर्यटनाच्या नकाशावर अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची खासियत काय आहे? जाणून घेऊया

हे टर्मिनल 4,15,000 चौरस फूट क्षेत्रफळात तयार करण्यात आलं आहे. या टर्मिनलचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून दरवर्षी 10 लाख प्रवासी प्रवास करू शकतात. या टर्मिनलमध्ये एकाच वेळी पाच क्रूझ जहाज थांबू शकतात. याशिवाय़ दररोज किमान 10 हजार प्रवास येथून प्रवास करू शकतात. 


या टर्मिनलमध्ये चेक-इन आणि इमिग्रेशनची सुविधा प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल. यासाठी येथे 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काऊंटर तयार करण्यात आले यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे आणि प्रवास अधिक आरामदायी होईल. 

केंद्रीय पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्री सर्बानंद सोनोवाल या टर्मिलनबाबत म्हणाले, मुंबईचा समुद्री इतिहास अत्यंत गौरवशाही आहे आणि हा आपल्या सभ्यतेचा महत्त्वाचा भाग आहे. ते पुढे  म्हणाले, मुंबई नेहमीच एक प्रमुख किनारा केंद्र राहिलं आहे.  ज्याने आपल्या व्यस्त सागरी व्यापाराद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठी भूमिका बजावली आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करणार आहे. हे टर्मिनल सुरू झाल्यामुळे मुंबई केवळ भारतातच नाही तर आशियातील एक प्रमुख क्रूझ टूरिजम डेस्टिनेशन म्हणून नावारुपास येईल. याशिवाय भारताच्या समुद्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. 

मुंबईतील अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल कुठे आहे? 

दक्षिण मुंबईतील इंदिरा डॉक, बॅलार्ड पिअर मुंबई येथे हा पोर्ट तयार करण्यात आला आहे. 

अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलसाठी किती खर्च आला? 

याच्या निर्मितीसाठी 556 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.