गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

लातूरच्या एमआयडीसीत गुटख्याच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. त्यावेळी धाड टाकणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला.

Advertisement
Read Time: 2 mins
लातूर:

राज्यात गुटखा बंदी असताना लातुरात गुटख्याची सर्रास निर्मिती होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रीही जोरात आहे. या पार्श्वभूमीवर लातूरच्या एमआयडीसीत गुटख्याच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. त्यावेळी धाड टाकणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी या कारखान्यातून तब्बल 03 कोटी 05 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लातूर एम.आय.डी.सी मधील कोंबडे अॅग्रो वेअर हाउस या ठिकाणी ही धाड टाकण्यात आली. धाड टाकल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. गुटख्याची पोतीच्या पोती इथे भरून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी ही सर्व पोती जप्त केली आहे. शिवाय सात जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या सर्व प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे. 

गुटखा बंदी असताना ही एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केल्यानं लातूर शहरात खळबळ उडाली आहे. शिवाय इतक्या खुल्या पद्धतीने गुटखा निर्मिती केली जात होती. त्यांना कोणाचे आशिर्वाद होते, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या कारवाईनंतर लातूर पोलिस आणखी काही ठिकाणी अशीच छापेमारी करणार आहेत का? शिवाय असे गुटखा बनवणारे कारखाने लातूर आणि परिसरात सुरू आहे का याबाबतही चर्चा लातूर शहरात रंगली आहे.  

Advertisement