मनोज सातवी
पोलिसांचे काम हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असते. त्या दृष्टीनं ते काम करत असतात. पोलिस म्हणला तर त्याच्या हातात दंडूका दिसतो. तर काही पोलिसांकडे बंदूक दिसते. पण इथलं चित्र मात्र थोडं वेगळं आहे. इथं पोलिसांच्या हातू दंडूक गायब आहे. त्या ऐवजी त्यांच्या हातात कुदळ आणि फावडा आला आहे. हे चित्र काही विचित्र असलं तरी ते सत्य आहे. पोलिस हातात कुदळ आणि फावडा घेवून रत्यावर उतरलेत. हे घडलं आहे वसईमध्ये. त्याला कारण आहे इथले खराब झालेले रस्ते. होय खराब झालेले रस्ते दुरूस्त करण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. हे पाहून पोलिसांनीच ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर या परिसरातले सर्व खड्डे त्यांनी बुजवले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असते. असे असताना NHAI च्या बेजबदार पणामुळे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस खड्डे बुजवण्यासाठी रसत्यालर उतरले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो. अनेक अपघात होतात.शिवाय अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी वसईतील पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि त्याच्या सहकारी पेल्हार फाटा भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला.
त्यानंतर हातात फावड आणि घमेला घेऊन पोलिस रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट खड्डे भरण्यास सुरूवात केली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा वाहन चालकांना मोठा त्रस्त सहन करावा लागतो. याशिवाय महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असून, त्याचा त्रास होत आहे. रस्ता आहे की खड्यांचे साम्राज्य असा प्रश्न या भागात पडला आहे. पण त्यावर कोणताही तोडगा निघत नाही हे पाहील्यावर पोलिसांनीच हे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर पोलिस खड्डे बुजबत आहेत हे पाहून लोकांनीही त्यांचे कौतूक केले.