Navi Mumbai Airport: सार्वजनिक उपक्रम समितीचा नवी मुंबई विमानतळ पाहणी दौरा, काय आहे अपडेट?

समितीने विशेषतः विमानतळाच्या धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा यंत्रणा, वाहतूक सुलभता आणि पर्यावरण रक्षण यावरील उपाय योजनांचा आढावा घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक उपक्रम समितीने बुधवारी पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान समितीने विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या अभ्यास दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. त्यांनी सिडको व NMIAL  Adani समूह यांच्या कडून सादरीकरणाद्वारे विमानतळाच्या कामांची सद्यस्थिती, नियोजित टप्पे, आणि सुरक्षेसंबंधी मान्यतांची माहिती घेतली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समितीने विशेषतः विमानतळाच्या धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा यंत्रणा, वाहतूक सुलभता आणि पर्यावरण रक्षण यावरील उपाय योजनांचा आढावा घेतला. DGCA आणि BCAS कडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी समितीचे प्रमुख आमदार राहुल कुल यांनी दिली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंह, NMIAL चे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: प्रेयसीचा साखरपुडा, प्रियकराची शेवटची इच्छा, हॉटेलमध्ये भेटले, रात्रभर राहीले, सकाळी मात्र...

समितीने प्रकल्पाच्या वेळापत्रकाबाबत समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात लोकार्पणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश ही यावेळी त्यांनी दिले. विमानतळ प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हे काम एकदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर NMIA हा देशातील एक महत्त्वाचा हवाई वाहतूक केंद्र ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.