Pune News: पुणेकरांना बुलेट ट्रेनचे डबल गिफ्ट! मुंबई आणि हैदराबादचा प्रवास सुसाट, वाचा तुमचं स्टेशन आणि माहिती

Pune Bullet Train Update: पुणेकरांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही शहरांशी पुणे हायस्पीड रेल्वेने जोडले जाणार आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Bullet Train Update: मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन स्वतंत्र बुलेट ट्रेन सुरु होणार आहेत.
मुंबई:

Pune Bullet Train Update: पुणेकरांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही शहरांशी पुणे हायस्पीड रेल्वेने जोडले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,81,377 कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची तरतूद केली असून यामध्ये सात नवीन हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन स्वतंत्र बुलेट ट्रेन मार्गांचा समावेश असल्याने महाराष्ट्रातील दळणवळणाला नवी गती मिळणार आहे.

मुंबई ते पुणे आणि हैदराबाद: प्रवासाचा वेळ वाचणार

प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्याच्या रेल्वे किंवा रस्ते प्रवासाच्या तुलनेत हा वेग थक्क करणारा असेल:

मुंबई ते पुणे: सध्या 3 ते 4 तास लागणारा हा प्रवास आता केवळ 48 मिनिटांत पूर्ण होईल.
पुणे ते हैदराबाद: या लांबच्या प्रवासासाठी आता केवळ 1 तास 55 मिनिटे लागतील.
प्रकल्पाचा वेग: या मार्गाचा डीपीआर (DPR) आधीच तयार असल्याने कामाला वेग मिळणार आहे. साधारण 5 ते 6 वर्षात ही ट्रेन रुळावर धावण्याची शक्यता आहे.



( नक्की वाचा : Budget 2026: टॅक्स नियमात मोठे फेरबदल, TDS आणि TCS कटकटीतून सुटका; वाचा तुमच्या फायद्याच्या मोठ्या गोष्टी! )

पुण्यात कुठे असणार स्टेशन?

बुलेट ट्रेनचे नियोजन करताना शहराच्या गर्दीचा विचार करून स्वतंत्र स्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे:

लोकेशन: पुण्यातील स्टेशन हे मुख्य रेल्वे स्टेशनऐवजी हडपसर किंवा लोणी काळभोर परिसरात असण्याची शक्यता आहे.
कनेक्टिव्हिटी: हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) असेल आणि मेट्रो तसेच रिंगरोडशी जोडले जाईल, जेणेकरून प्रवाशांना शहरात ये-जा करणे सोपे होईल.
नवी मुंबई कनेक्शन: नवी मुंबईतील स्थानक भुयारी असेल आणि ते थेट विमानतळाशी जोडले जाणार आहे.

बुलेट ट्रेनचा संपूर्ण मार्ग आणि स्टेशन

हा हायस्पीड कॉरिडॉर एकूण 711 किलोमीटरचा असून त्याचा मार्ग खालीलप्रमाणे असेल:

प्रमुख स्टेशन: नवी मुंबई – लोणावळा (शहरापासून 4 किमी दूर) – पुणे – कुर्डुवाडी – सोलापूर – कलबुर्गी (गुलबर्गा) – विकाराबाद – हैदराबाद.
बांधकाम: मुंबई-पुणे घाटात विशेष बोगदे तयार केले जातील, तर इतर ठिकाणी मार्ग पिलर्सवर (एलिव्हेटेड) असेल.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

रेल्वेसाठी एकूण तरतूद - 2,81,377 कोटी रुपये 
कॉरिडॉरची लांबी - 711 किलोमीटर 
स्टेशनचे स्वरूप - एलिव्हेटेड (उन्नत) 
मुंबई-पुणे वेळ - 48 मिनिटे 
पुणे-हैदराबाद वेळ - 1 तास 55 मिनिटे 

Topics mentioned in this article