जाहिरात

Pune News : पुणेकरांना CNG चा झटका, मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती रुपयांची झालीय दरवाढ?

पुणेकरांना पुन्हा एकदा सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. ही दरवाढ 15 जूनच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 16 जून 2026 पासून लागू होणार आहे.

Pune News : पुणेकरांना CNG चा झटका, मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती रुपयांची झालीय दरवाढ?
Pune CNG Rate Increases
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune CNG Hike Latest News : पुणेकरांना पुन्हा एकदा सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या संपीडित नैसर्गिक वायूच्या (सीएनजी) किरकोळ विक्री दरात प्रतिकिलो 1 रुपयांची वाढ जाहीर केली आहे.ही दरवाढ 15 जूनच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 16 जून 2026 पासून लागू होणार आहे.

दरवाढीनंतर पुणे शहर,पिंपरी-चिंचवड तसेच चाकण,तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीचा किरकोळ विक्री दर 95.75 रुपये प्रतिकिलो इतका होणार आहे.नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एमएनजीएलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी सध्याच्या इंधन दरांच्या तुलनेत सीएनजी हे अजूनही किफायतशीर इंधन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नक्की वाचा >> Mumbai News : पावसाळापूर्व तयारीचा DCM शिंदेनी घेतला आढावा, म्हणाले, "मुंबईतील 1700 किमीच्या रस्त्यांचे.."

पीएनजीच्या दरातही किरकोळ वाढ

प्रवासी वाहनांसाठी सीएनजीमुळे पेट्रोलच्या तुलनेत जवळपास 47 टक्के तर डिझेलच्या तुलनेत जवळपास 25 टक्के बचत होत असल्याचे एमएनजीएलने नमूद केले आहे. तसेच रिक्षाचालकांनाही डिझेलच्या तुलनेत जवळपास 25 टक्के बचत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, घरगुती पाइपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) दरातही किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> KDMC News : शिवसेना गटनेते विश्वनाथ राणेंचा 'या' आमदाराला घरचा आहेर, केडीएमसी महासभेत राजकीय खडाजंगी

वाहनधारकांसह घरगुती ग्राहकांच्या मासिक खर्चातही वाढ

घरगुती पीएनजीचा दर 50.65 रुपये प्रति एससीएमवरून 5.50 रुपये प्रति एससीएम करण्यात आला असून हा दरही 15/16 जूनच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. एमएनजीएलने ग्राहकांना सुधारित दरांची नोंद घेण्याचे आवाहन केले असून वाढत्या इनपुट खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे.सीएनजी आणि पीएनजी दरवाढीमुळे वाहनधारकांसह घरगुती ग्राहकांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात वाढ होणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com