अविनाश पवार
सहकारनगर पोलिसांनी भोंदू ज्योतिष अखिलेश लक्ष्मण राजगुरु याला विनयभंगप्रकरणी अटक केली आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार अतिशय धक्कादायक असून सर्वच जण त्याने हादरून गेले आह. मैत्रिणीच्या सल्ल्याने पीडित तरुणी ही या भोंदू ज्योतिषाला भेटायला गेली होती. मात्र त्यावेळी तिच्या बरोबर जे काही घडलं त्यामुळे तिच्या पायाखालची वाळूच सरकली होती असं तिने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे.
नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा
12 जुलै 2025 रोजी भावाची पत्रिका दाखवण्यासाठी ती तरूणी राजगुरु याच्याकडे गेल्या होती. पत्रिका पाहिल्यानंतर भावाला एक वनस्पती द्यायची आहे, असे सांगून ती त्यांने आणायला सांगितली होती. 18 जुलै रोजी वनस्पती आणायला सांगून, 19 जुलै रोजी धनकवडी येथील कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे “वनस्पती डोक्यावर ठेवून मंत्र म्हणावे लागतील,” असे सांगण्यात आले. त्यावरून या तरुणीच्या मनात संशयाची पाल चुकचूकली. इथं काही तरी चुकीचं घडणार आहे हे तिच्या लक्षात आलं.
तक्रार केलेल्या तरुणीला संशय आला. ती तिथून निघून जाण्यासाठी निघाली. त्याच वेळी त्या भोंदी ज्योतिषी राजगुरुने तिला जबरदस्तीने मिठी मारली. विनयभंग केला असा आरोप या तरुणीने केला आहे. झालेल्या प्रकारानंतर तरुणीने झालेली घटना आपल्या भावाला फोन करून सांगितली. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ज्योतिषाच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली आहे.