Pune News : शेतकऱ्यांचा नवा आधार ! माती तपासणी ते मार्केट रेट्स, सर्व माहिती एकाच ॲपवर; वाचा सर्व माहिती

Mahavistar App Pune : शेतकऱ्यांना मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी हे अत्याधुनिक एआय-आधारित (AI-based) ॲप विकसित करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mahavistar App Pune : हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्युशन' म्हणून काम करणार आहे.
पुणे:

Pune News : हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील सततचे चढ-उतार आणि शेतीसंबंधी तांत्रिक माहितीचा अभाव अशा तिहेरी समस्यांशी राज्यातील शेतकरी रोज झुंजत आहेत. पण आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने एक अत्यंत दिलासादायक आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी ‘महाविस्तार' (Mahavistar App)  हे अत्याधुनिक एआय-आधारित (AI-based) ॲप विकसित करण्यात आले आहे.

कसे आहे ॲप?

हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्युशन' म्हणून काम करणार आहे. याचा अर्थ, शेती संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागणार नाही. या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी भाषेतील चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या समस्या किंवा शंका यांचे निरसन करायचे असल्यास, ते मजकूर (Text) किंवा आवाजाद्वारे (Voice) थेट चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक म्हणून केवळ काही सेकंदात अचूक सल्ला उपलब्ध करून देईल.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकर पुन्हा खोळंबणार! 'या' कारणामुळे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार, 118 कोटी... )

'फार्मर आयडी' अनिवार्य

‘महाविस्तार' ॲपचा फायदा घेण्यासाठी कृषी विभागाने ‘फार्मर आयडी' (Farmer ID) असणे बंधनकारक ठेवले आहे. या आयडीमुळे ॲप प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनण्यास मदत होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

Advertisement

या फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, कर्ज-विमा नोंदी, त्याने घेतलेल्या पिकाची माहिती, सातबारा उतारा आणि बँक तपशील अशा विविध महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असेल. यामुळे सरकारी योजना थेट गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )

शेतकऱ्यांसाठी ॲपमधील  5 प्रमुख सुविधा

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील 5 प्रमुख आणि अत्यंत उपयुक्त माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे शेती करणे अधिक सोपे होणार आहे.

Advertisement

1. हवामान अंदाज:  शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अचूक अंदाज आणि हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांवरील उपाययोजना.

2. पीक सल्ला आणि शिफारसी: कोणत्या जमिनीत कोणती लागवड पद्धती वापरावी, तसेच तज्ज्ञांकडून आवश्यक असलेला पीक सल्ला आणि शिफारसी.

3. कीड आणि खत व्यवस्थापन: पिकांवरील कीड व्यवस्थापनाची माहिती आणि जमिनीच्या आरोग्यानुसार खतांचा संतुलित वापर कसा करावा याचे मार्गदर्शन.

4. बाजारभाव आणि व्यवस्थापन: पिकांचे ताजे बाजारभाव, गोदाम व्यवस्थापन आणि त्यांची उपलब्धता याची माहिती.

5. शासकीय योजना: मृदा आरोग्याची माहिती आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांची संपूर्ण माहिती.

कृषी विभागाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या हातात येत आहे. यामुळे शेती अधिक परिणामकारक, माहितीपूर्ण आणि वेळेनुसार करणे शक्य होईल. माहितीच्या योग्य वापरातून शेतीची उत्पादकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article