Pune Land Scam : पुण्यात पुन्हा भूखंडाचा खेळ!पार्थ पवारांच्या वादात अडकलेले तहसीलदार दुसऱ्याच घोटाळ्यात उडाले!

Pune Land Scam : पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनामुळे पुणे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Land Scam : शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Land Scam : पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनामुळे पुणे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांचे निलंबन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित कथित भूखंड गैरव्यवहारामुळे नव्हे, तर पुण्यातील बोपोडी येथील एका अत्यंत गंभीर जमीन प्रकरणात अनियमितता केल्यामुळे झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे. शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे बोपोडीचं प्रकरण?

तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचं मूळ बोपोडी येथील एका जमीन व्यवहारात आहे. ते पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदेशीर नियम आणि वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आलं आहे.

बोपोडी येथील या जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदीमध्ये 'अ‍ॅग्रीकल्चर डेरीकडे' असे शासकीय विभागाचे नाव असतानाही, येवले यांनी आपल्या अनाधिकाराचा वापर करून अर्जदारांच्या बाजूने आदेश दिले. या गंभीर अनियमिततेमुळे शासकीय जमीन एका खासगी व्यक्तीस प्रदान करण्यात आली, ज्यामुळे शासकीय जमिनीचा अपहार झाला आहे.

( नक्की वाचा : BMC Election : 'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही! न्यूयॉर्कच्या निकालानंतर भाजपा नेत्याचा इशारा, अर्थ काय? )
 

महसूल विभागाने हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं आहे. शासकीय अधिकारी म्हणून सूर्यकांत येवले यांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आणि अशोभनीय असल्याचं नमूद करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या काळात येवले यांना कोणतीही खाजगी नोकरी किंवा धंदा करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

या सर्व घडामोडी अशा वेळी घडल्या आहेत, जेव्हा पुण्यातीलच मुंढवा येथील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावावर झालेल्या दुसऱ्या एका जमीन घोटाळ्याचे आरोप चर्चेत आहेत. पार्थ पवार प्रकरणाचे आरोप समोर येताच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूखंड प्रकरणांमध्ये कारवाई आणि चौकशीचे आदेश दिल्याने महसूल विभागात तणाव वाढला आहे.

( नक्की वाचा : Kalyan News : 'तुम्हीच खंजीर खुपसला!'...KDMC मध्ये युती तुटणार? शिंदे गट-भाजपच्या वादात स्फोटक आरोप-प्रत्यारोप )
 

पार्थ पवार यांच्यावरील आरोप काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे एका जमीन व्यवहारातील गैरव्यवहारामुळे वादात सापडले आहेत. आरोपानुसार, पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क भागातील जवळपास 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली. या कंपनीत त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत.

Advertisement

ज्याची बाजार किंमत सुमारे 1800 कोटी रुपये आहे, ती जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली, असा आरोप आहे. या व्यवहारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, या खरेदीसाठी लागणारी तब्बल 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली. संपूर्ण व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला असल्याचं सांगितलं जातं.

आरोप करणाऱ्या पक्षांचा दावा आहे की, ही जमीन सरकारी असून त्यावर गैरव्यवहार करून डल्ला मारण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हा सर्व व्यवहार रद्द करण्याची आणि या प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी करत अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
 

Advertisement