Pune Lohagad Case: केतनला ढकलल्यानंतर सियाचे पहिले शब्द काय होते? गडावरील सुरक्षारक्षकाने सांगितलं...

Ketan Agarwal Murder case: केतन अग्रवाल याला ढकलून खून केल्याच्या प्रकरणात एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सुरक्षारक्षकाने सांगितलं की, धावत गेल्यावर सियाने 'येथून कोणीतरी खाली पडले आहे' असे सांगत 'मदत करा, मदत करा' असा आरडाओरडा सुरू केला होता

जाहिरात
Read Time: 3 mins

पुण्यातील केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावर त्याच्या होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. या प्रकरणाच्या तपासादरम्याने अनेक खुलासे होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी  यांना खून आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दरम्यान, 18 जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेच्या तात्काळ नंतर काय घडले, याचे धक्कादायक वर्णन लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी केले आहे.

ओरडण्याचा आवाज ऐकला अन् मी धावत गेलो 

सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, "मी माझ्या ड्युटी पॉईंटवर असताना मला दुरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने धावत गेलो. तिथे पोहोचल्यावर मी पर्यटकांना काय झाले असे विचारले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सिया गोयल हिने मला सांगितले की, 'येथून कोणीतरी खाली पडले आहे'. तिने मला त्यावेळी फार माहिती दिली नाही. मी वेळ न घालवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला."

Advertisement

जाधव यांनी पुढे सांगितले की, सिया गोयल सतत "हेल्प, हेल्प" म्हणून ओरडत होती. तिची वर्तणूक घाबरल्यासारखी दाखवली जात होती. किल्ल्यावर 24 तास सुरक्षा असते आणि जवळच पोलीस स्टेशन आहे. परंतु या भागात नेटवर्कच्या समस्येमुळे कधीकधी संपर्कास उशीर होतो, असेही त्यांनी नमूद केले.

(नक्की वाचा-  Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)

फोन कॉल्सवरून रचला खुनाचा कट

पोलीस तपासात समोर आले आहे की, सिया गोयल आणि चेतन चौधरी गेल्या 6 महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. या काळात त्यांच्यात 2004 फोन कॉल्स झाले असून त्यांनी तब्बल 238 तास एकमेकांशी संवाद साधला. यातील काही कॉल्स तर 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ चालत असत.

घटनेच्या दिवशी, सिया आणि चेतन पुण्याच्या एका कॅफेमध्ये भेटले होते, जिथे त्यांनी केतनला किल्ल्यावरून ढकलण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यासह संपूर्ण खुनाचा कट आखला होता. त्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार ट्रेकिंग दरम्यान झालेला एक अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचला होता.

(नक्की वाचा-  Mumbai Rain: मुंबईतून पाऊस गायब! नागरिकांचं टेन्शन वाढलं; पुन्हा कधी बरसणार? हवामान विभागाने दिली माहिती)

नोव्हेंबरमध्ये उदयपूरमध्ये होणार होता भव्य विवाहसोहळा

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह नोव्हेंबर 2026 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये होणार होता, ज्याचे बुकिंगही पूर्ण झाले होते. फेब्रुवारीमध्येच त्यांचा साखरपुडा झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आग्रह करत होती. 31 मे रोजी त्यांनी किल्ल्याला भेट दिली होती. त्यानंतर 4 जून रोजीही तिने आग्रह केला, मात्र केतनच्या आईने परवानगी दिली नाही.

Advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, 14 जून रोजी लोहगडच्याच एका कड्यावरून सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केतनने कड्यावरील एका झुडुपाचा आधार घेतल्याने तो थोडक्यात वाचला होता.